Team India ICC World Cup 2023 Full Schedule | टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला केव्हापासून सुरुवात? पाहा वेळापत्रक

Team India ICC World Cup 2023 Cricket Full Schedule in Marathi | टीम इंडिया वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 9 सामने खेळणार आहे. जाणून घ्या भारतीय क्रिकेट संघाचं संपूर्ण वेळापत्रक.

Team India ICC World Cup 2023 Full Schedule |  टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला केव्हापासून सुरुवात? पाहा वेळापत्रक
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 1:42 PM

मुंबई | अखेर क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. आयसीसी वनडे मेन्स वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. वर्ल्ड कप स्पर्धेचा 5 ऑक्टोबरपासून श्रीगणेशा होणार आहे. तर फायनल मॅच 19 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. पहिला आणि शेवटचा अंतिम सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्येच खेळवण्यात येणार आहे. एकूण 46 दिवस क्रिकेट चाहत्यांना फुल्ल ऑन थरार अनुभवता येणार आहे. वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध उपविजेत्या न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. दरम्यान आपण यजमान टीम इंडियाच्या सामन्यांचं सविस्तर वेळापत्रक जाणून घेणार आहोत.

टीम इंडिया एकूण 9 सामने खेळणार आहे. भारताचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे. हा सामना चेन्नईत 8 ऑक्टोबरला आयोजित केला गेला आहे. तर बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाक ही मॅच 15 ऑक्टोबरला होणार आहे. हा महामुकाबला नरेंद्र मोदी स्टेडियममध्येच खेळवण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

भारत पाक सामना केव्हा?

टीम इंडियाच्या वर्ल्ड कपमधील सामन्याचं वेळापत्रक

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 8 ऑक्टोबर, चेन्नई.

टीम इंडिया विरुद्ध अफगानिस्तान – 11 ऑक्टोबर, दिल्ली.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान – 15 ऑक्टोबर, अहमदाबाद

टीम इंडिया विरुद्ध बांग्लादेश – 19 ऑक्टोबर, पुणे.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड – 22 ऑक्टोबर, धर्मशाळा.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड – 29 ऑक्टोबर, लखनऊ.

टीम इंडिया विरुद्ध क्वालीफायर – 2 नोव्हेंबर, मुंबई.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण अफ्रीका – 5 नोव्हेंबर, कोलकाता.

टीम इंडिया विरुद्ध क्वालीफायर – 11 नोव्हेंबर, बंगळुरु.

वर्ल्ड कपबाबत थोडक्यात पण सविस्तर

वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात 5 ऑक्टोबरला तर शेवट 19 नोव्हेंबरला होणार आहे. स्पर्धेतील पहिला आणि अंतिम सामना म्हणजेच शेवटचा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. एकूण 10 संघ वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. राउंड रॉबिन पद्धतीने हा वर्ल्ड कप पार पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक टीम ही 9 संघांविरुद्ध प्रत्येकी 1 या हिशोबाने एकूण 9 मॅच खेळणार आहे.

या 10 संघामधून पहिले 4 संघ हे सेमी फायनलमधील पोहचतील. सेमी फायनलचे 2 सामने हे मुंबईतील वानखेडे आणि कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. पहिली सेमी फायनल मॅच बुधवारी 15 नोव्हेंबर आणि दुसरी सेमी फायनल मॅच 16 नोव्हेंबरला पार पडेल. तर फायनल मॅच रविवारी 19 नोव्हेंबरला होईल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.