IND vs AUS : टीम इंडिया पुन्हा देणार पाकिस्तानला धोबीपछाड, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत मोठी संधी
IND vs AUS : वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला स्वत:ला सिद्ध करण्याची एक संधी आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका आहे. या मालिकेतून पाकिस्तानला धोबीपछाड देण्याची संधी देखील आहे.
मुंबई : आशिया कप 2023 जेतेपद जिंकल्यानंतर टीम इंडिया आता वनडे वर्ल्डकपसाठी सज्ज झाली आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेतून टीम इंडियाला पाकिस्तानला धक्का देण्याची संधी आहे. आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केलं. आता आयसीसी वनडे रँकिंगमध्ये मोठी झेप घेण्याची संधी आहे. सध्या पाकिस्तानचा संघ आयसीसी रँकिंगमध्ये टॉपला आहे. तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानी असून ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे तीन सामन्यांची मालिका खिशात घातली तर थेट पहिल्या स्थानावर विराजमान होईल. भारत आणि पाकिस्तान यांचे समान गुण आहे. दोन्ही संघांचे रेटिंग पॉइंट्स 115 आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका हे चित्र पालटू शकते. भारताला ही मालिका किमान 2-1 ने जिंकणं गरजेचं आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला सामना जिंकताच नंबर 1
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका आहे. पहिला सामना 22 सप्टेंबरला मोहालीत होणार आहे. मोहालीतील पहिला सामना जिंकताच आयसीसी गुणतालिकेत मोठा फरक दिसून येईल. टीम इंडिया नंबर 1 होईल. यामुळे वनडे वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढेल. भारताचा वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे. हा सामना 8 ऑक्टोबरला होणार आहे.
ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी टीम इंडिया
पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडिया : केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल (जखमी असून बरा झाला तर संघात खेळेल), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.