वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडिया तिसऱ्यांदा? आयसीसीकडून आकडेवारीच जाहीर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी चुरशीची लढाई दिसत आहे. असं असताना भारतीय संघ अंतिम फेरी गाठणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या भारतीय संघ अव्वल स्थानी असून अंतिम फेरीसाठी प्रमुख दावेदार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडिया तिसऱ्यांदा? आयसीसीकडून आकडेवारीच जाहीर
Follow us
| Updated on: Sep 12, 2024 | 6:08 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं तिसरं पर्व सुरु आहे. आतापर्यंतच्या दोन पर्वात टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली. पण दोन्ही वेळेस पदरी अपयश पडलं. एकदा न्यूझीलंडने आणि एकदा ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं. त्यामुळे टीम इंडिया तिसऱ्या पर्वासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असल्याने प्रबळ दावेदार आहे. आता बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडणार आहे. या मालिकेनंतर चित्र आणखी स्पष्ट होईल. असं असताना भारतीय संघाला अंतिम फेरी गाठण्याची किती संधी आहे, याबाबतचा अपडेट आयसीसीकडून देण्यात आले आहेत. भारताने आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले असून त्यापैकी 6 सामन्यात विजय, दोन सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. भारताची विजयी टक्केवारी 68.52 इतकी असून अव्वल स्थानी आहे. अजून भारतीय संघाला 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. यापैकी पाच सामने भारतात आणि पाच सामने भारताबाहेर होणार आहेत. भारताने हे सर्व सामने जिंकले तर विजयी टक्केवारी ही 85.09 इतकी होईल. पण असं शक्य नाही.

भारताचे दहा पैकी 2 सामने बांगलादेशसोबत, 3 सामने न्यूझीलंडसोबत आणि पाच सामना ऑस्ट्रेलियासोबत होणार आहेत. जर टीम इंडिया भारतात होणाऱ्या पाच सामन्यात विजय मिळवला, तर विजयी टक्केवारी ही 79.96 इतकी होईल. ही विजयी टक्केवारी अंतिम फेरी गाठण्यासाठी बस होईल. त्यामुळे टीम इंडिया अंतिम फेरी गाठण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाही अंतिम फेरी गाठू शकते. ऑस्ट्रेलियाचे 7 सामने शिल्लक आहेत. त्यापैकी 5 सामने भारताशी होणार आहेत. तर 2 सामने श्रीलंकेत खेळणार आहे. जर ऑस्ट्रेलियाने सर्व सामने जिंकले तर विजयी टक्केवारी ही 76.32 इतकी होईल. न्यूझीलंडही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत आहे. न्यूझीलंडचा संघ 8 कसोटी सामने खेळणार आहे. जर न्यूझीलंडने सर्व सामने जिंकले तर विजयी टक्केवारी 76.32 पर्यंत पोहोचेल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड देता येईल.

दुसरीकडे, बांगलादेशचा संघ सर्व सामने जिंकला तर 72.92 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. श्रीलंकेचा संघ 69.23 टक्क्यांपर्यंत, इंग्लंडचा संघ 57.95 टक्क्यांपर्यंत, दक्षिण अफ्रिकेचा संघ 69.44 टक्क्यांपर्यंत, पाकिस्तानचा संघ 59.52 टक्क्यांपर्यंत आणि वेस्ट इंडिजचा संघ 43.59 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघ वगळता इतर संघांचं अंतिम फेरीत पोहोचणं कठीण आहे.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.