IND vs AUS : वर्ल्डकपच्या ओपनिंग सामन्यात टीम इंडियावर पराभवाचं सावट! 36 वर्षे जुना रेकॉर्ड बघा काय सांगतोय
IND vs AUS, World Cup 2023 :वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता हळूहळू पुढे जात आहे. आता भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. 8 ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. पण क्रिकेट चाहत्यांना एक भीती सतावत आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेला आता रंगत येत चालली आहे. पहिल्या टप्पातील सामने सुरु आहेत. विजयासह दोन गुणांची कमाई आणि नेट रनरेटमध्येही चुरस निर्माण झाली आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. त्यामुळे या सामन्यातील विजयासह स्पर्धेची सुरुवात करण्याचा मानस आहे. पण भारतासमोर तगडी ऑस्ट्रेलियन टीम आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना वेगळीच भीती सतावत आहे. कारण 36 वर्षानंतर असा योग जुळून आला आहे. 2013 पासून आतापर्यंत टीम इंडियाने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे टीम इंडियावर जेतेपदासाठी दडपण असणार आहे. भारताने शेवटचा वर्ल्डकप 2011 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात जिंकला होता. त्यामुळे 12 वर्षानंतर पुन्हा एकदा स्पर्धा भारतात होणार असून जेतेपदासाठी टीम इंडियाला दावेदार मानलं जात आहे.
नेमका काय योगायोग आहे ते जाणून घ्या
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सामना होणार आहे. 36 वर्षांपूर्वी याच मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला होता. हा सामना भारताने 1 धावेने गमावला होता. त्यामुळे पुन्हा एकदा असं होणार तर नाही ना अशी भारतीय क्रीडाप्रेमींना भीती आहे.
1987 च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला. ऑस्ट्रेलियन संघाला भारताने फलंदाजीचं आमंत्रण दिलं. ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमवून 270 धावा केल्या. त्यावेली ज्योफ मार्श याने 110 धावा केल्या. तर डेविड बून याने 49 आणि डीन जोन्स याने 39 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया 269 धावांवर ऑल आऊट झाली होती.
दोन्ही संघांचे खेळाडू
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया टीम | पॅट कमिन्स (कर्णधार ), स्टीव्ह स्मिथ, ॲलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन ॲबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.