मुंबई | टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटीत चौथ्या दिवशीच विजय मिळवत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. टीम इंडियाच्या विजयात यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल आणि जसप्रीत बुमराह या त्रिकुटाने निर्णायक भूमिका बजावली. यशस्वीने द्विशतक आणि शुबमन गिलने शतकी खेळी केली. तर यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याने दोन्ही डावात टीम इंडियासाठी बॉलिंगने चमकदार कामगिरी केली. बुमराहने पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 3 अशा एकूण 9 विकेट्स घेतल्या. बुमराहच्या या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मात्र विजयाच्या काही मिनिटांनी टीम इंडियासाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. बुमराहला तिसऱ्या कसोटीतून विश्रांती देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तिसरा कसोटी सामना हा 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राजकोट येथे सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
इंग्लंड विरुद्धची ही कसोटी मालिका एकूण 5 सामन्यांची आहे. बुमराहने सलग 2 सामने खेळले आहेत. तर 3 सामने बाकी आहेत. अशात सातत्याने खेळल्याने बुमराहच्या फिटनेसवर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे कोणतीही जोखीम नको म्हणून बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. आता बुमराहला विश्रांती मिळाल्यास प्लेईंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार, याकडेही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
जसप्रीत बुमराहला तिसऱ्या कसोटीतून विश्रांती!
Jasprit Bumrah could be rested from the 3rd Test against England in Rajkot. (Cricbuzz). pic.twitter.com/GhFxbpNU3e
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 5, 2024
टेस्ट सीरिजसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, ऑली रॉबिन्सन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, श्रीकर भारत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, सरफराज खान, आवेश खान , सौरभ कुमार आणि ध्रुव जुरेल.