IND vs NZ : फक्त 3 विकेट्स, तरीही बुमराहचा कारनामा, या 2 दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी

| Updated on: Oct 20, 2024 | 8:31 PM

Jasprit Bumrah record in Test :टीम इंडियाचा नंबर 1 बॉलर जसप्रीत बुमराह याने न्यूझीलंड विरुद्धच्या दोन्ही डावात एकूण 3 विकेट्स घेतल्या. बुमराहने यासह 2 दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे.

IND vs NZ : फक्त 3 विकेट्स, तरीही बुमराहचा कारनामा, या 2 दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
rohit sharma and jasprit bumrah team india
Image Credit source: BCCI
Follow us on

न्यूझीलंडने भारत दौऱ्यात कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात बंगळुरु येथे टीम इंडियावर 8 विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडने यासह भारतात 36 वर्षांनी पहिला तर एकूण तिसरा विजय मिळवला.  न्यूझीलंडने टॉम लॅथमच्या नेतृत्वात हा विजय मिळवला. तसेच पाहुण्यांनी या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.  रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला पराभूत व्हावं लागलं. भारताला हा सामना गमवावा लागला असला तरी यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याने धारदार बॉलिंगच्या जोरावर इतिहास घडवला आहे. बुमराहने या सामन्यातील दोन्ही डावात मिळून एकूण 3 विकेट्स घेतल्या. यासह जसप्रीत बुमराह याच्या नावावर कसोटी कारकीर्दीत एकूण 173 विकेट्सची नोंद झाली. बुमराहने कसोटीत आतापर्यंत 39 सामन्यांमध्ये या विकेट्स घेतल्या आहेत.

दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी

बुमराहने 173 विकेट्ससह दिग्गज गोलंदाजांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. बुमराहने न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज रिचर्ड हेडली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रा याच्या दोघांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. रिचर्ड आणि मॅक्ग्रा या दोघांनीही 39 सामन्यांमध्ये 173 विकेट्स घेतल्या होत्या. आता बुमराहनेही तसंच करत असा कारनामा करणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. बुमराह यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या साखळीत सर्वाधिक विकेट्स घेणारा एकूण पाचवा गोलंदाज ठरला. बुमराहने या साखळीत एकूण 45 विकेट्स घेतल्या आहेत.

39 कसोटी सामन्यांनंतर विकेट्स

  • रिचर्ड हेडली – 173 विकेट्स
  • ग्लेन मॅक्ग्रा – 173 विकेट्स
  • जसप्रीत बुमराह – 173 विकेट्स

तसेच बुमराहच्या नावावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप या साखळीच्या इतिहासात एकूण 124 विकेट्स झाल्या आहेत. बुमराह या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा क्रिकेट विश्वातील सहावा गोलंदाज ठरला आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.