INDvsAUS | टीम इंडियाला जबर धक्का, स्टार बॉलर आता मालिकेतूनच बाहेर

टीम इंडियासाठी नागपूर कसोटी दरम्यान अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार बॅट्समन हा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित सामन्यांमधूनही बाहेर झाला आहे.

INDvsAUS | टीम इंडियाला जबर धक्का, स्टार बॉलर आता मालिकेतूनच बाहेर
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 4:03 PM

नागपूर : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपूरमध्ये पहिला कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळादरम्यान वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा स्टार खेळाडू हा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन भयंकर वाढलं आहे. अवघ्या काही महिन्यांवर वनडे वर्ल्ड कप आला आहे. त्या हिशोबाने टीम मॅनेजमेंट या खेळाडूबाबत कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही.

टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह बॉर्डर गावसकर कसोटीतून कायमचा आऊट झाला आहे. याआधी बुमराहची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटींसाठी दुखापतीमुळे निवड करण्यात आली नव्हती.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित 2 कसोटींसाठी बुमराह फिट होऊन त्याची निवड होईल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र या रिपोर्टमुळे टीम इंडियाच्या चाहत्यांची आशा मावळली आहे. मात्र बुमराह ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजमधून कमबॅक करु शकतो, असंही या रिपोर्टमध्ये म्हटंल आहे. पण दुसरी आणि तितकीच महत्वाची बाब म्हणजे बीसीसीआयकडून बुमराहबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

हे सुद्धा वाचा

टेलीग्राफने सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितलं, त्यानुसार बुमराह वेळेआधीच ठीक झाला आहे. तो दुखापतीतून सावरतोय. बुमराह एनसीएत दुखापतीतून लवकरात बुमराह लवकर बरा होण्यासाठी मेहनत करतोय. बुमराहने बॉलिंगच्या सरावाला सुरुवात केलीय. मात्र टीम मॅनेजमेंट बुमराहच्या बाबत कोणतीही जोखीम घ्यायला तयार नाही. यामुळेच बुमराहला कसोटीतून मालिकेतून बाहेर ठेवण्यात आल्याचं म्हटलं जातंय.

दरम्यान बुमराह सप्टेंबर 2022 पासून मैदानापासून बाहेर आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराहला अनेक मालिकांना मुकावं लागलं आहे.

पहिल्या कसोटीत टीम इंडियाकडे आघाडी

दरम्यान टीम इंडियाने नागपूर कसोटीतील पहिल्या डावात 100 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे. कॅप्टन रोहित शर्मा याच्या झुंजार 120 धावांच्या शतकी खेळीमुळे टीम इंडिया चांगल्या स्थितीत पोहचली. टीम इंडियाने आधी ऑस्ट्रेलियाला 177 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 बाद 77 धावांपर्यंत मजल मारली.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने झटपट विकेट गमावल्या. मात्र दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा खंबीर पणे उभा राहिला. रोहितने या दरम्यान शतक ठोकलं.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.