वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित बिघडलं, आता असं आहे समीकरण

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं भारताचं गणित आता बिघडलं आहे. भारताला काही करून हा सामना ड्रॉ किंवा जिंकणं भाग होतं. त्यामुळे भारताच्या हातून ही सूत्र श्रीलंकेच्या हाती गेली आहेत. ते पण भारताने सिडनी कसोटीत विजय मिळवला तर..

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित बिघडलं, आता असं आहे समीकरण
Follow us
| Updated on: Dec 30, 2024 | 12:29 PM

ऑस्ट्रेलियाने चौथा कसोटी सामना जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. चौथ्या कसोटी सामन्यात नितीश कुमार रेड्डीच्या खेळीने चांगलं कमबॅक झालं होतं. पण काही खेळाडूंचा अतिशहाणपणा भारताला नडला. तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा खराब फॉर्म असूनही वारंवार मिळणारी संधी भारताच्या पराभवाचं कारण ठरलं. खरं तर न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका भारताने 3-0 ने गमावली तिथेच सर्व काही संपलं होतं. पण ऑस्ट्रेलियात टीम इंडियात कमबॅक करेल अशी आशा होती. पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारताने चांगली कामगिरी केली. पहिल्याच कसोटी सामन्यात विजय मिळवून आघाडी घेतली होती. त्यामुळे आशा वाढल्या होत्या. मात्र दुसऱ्या कसोटीपासून रोहित शर्माचं नेतृत्व आणि फलंदाजी यामुळे टीम इंडियाचं नुकसान झालं. भारताला दोन सामन्यात पराभवाचं तोंड तर एक सामना ड्रॉ झाला. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं स्वप्न जवळपास भंगलं आहे.

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला असून 61.45 विजयी टक्केवारी झाली आहे. या विजयासाठी गुणतालिकेत दुसरं स्थान कायम असून अंतिम फेरीसाठी मजबूत दावा केला आहे. ऑस्ट्रेलियाला आता एका सामन्यात विजय मिळवला की स्थान पक्कं होईल. ऑस्ट्रेलियाला आता तीन सामने खेळायचे आहेत. त्यापैकी 1 सामना भारताशी आणि दोन सामने श्रीलंकेशी खेळायचे आहेत. यापैकी एका सामन्यात विजय मिळवला की अंतिम फेरीत धडक मारेल. दुसरीकडे, टीम इंडियाचं पराभवामुळे नुकसान झालं आहे. गुणतालिकेत टीम इंडिया 53.27 विजयी टक्केवारीसह तिसऱ्या स्थानवार आहे. त्यामुळे पाचवा कसोटी सामना जिंकला तरी सर्वस्वी श्रीलंका ऑस्ट्रेलिया मालिकेवर अवलंबून राहावं लागणार आहे.

WTC_Point_Table (3)

दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेने स्थान पक्कं केलं आहे. दक्षिण अफ्रिकेने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठणारा चौथा संघ ठरला आहे. यापूर्वी भारताने दोनदा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने एकदा धडक मारली आहे. दोन्ही वेळेस टीम इंडियाचा पराभव करून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने जेतेपदावर नाव कोरलं आहे.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.