30 शतकं आणि 11 हजारांपेक्षा अधिक धावा, पहिल्याच सामन्यात द्विशतक, तरीही टीम इंडियात निवड न होताच निवृत्त

अमोल मुजुमदारने (Amol Mujumdar) एकूण 171 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 30 शतक आणि 60 अर्धशतकांसह 11 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

30 शतकं आणि 11 हजारांपेक्षा अधिक धावा, पहिल्याच सामन्यात द्विशतक, तरीही टीम इंडियात निवड न होताच निवृत्त
सचिन तेंडुलकर आणि अमोल मुजुमदार
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 11:46 AM

मुंबई : क्रिकेट विश्वात (Cricket) दररोज अनेक खेळाडू क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न पाहतात. ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड आणि कठोर मेहनत करतात. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वांनाच संधी मिळतेच असं नाही. काहींच स्वप्न हे अधुर राहतं तर काहींचं पूर्ण होतं. निवड समिती काही खेळाडूंवर दमदार कामगिरीनंतरही विश्वास दाखवत नाही. त्यामुळे अशा खेळाडूंचं करियर हे सुरु होण्याआधीच संपुष्टात येतं. असंच काहीसं झालं ते प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पणात द्विशतक करणाऱ्या मुंबईकर (Amol Mujumjdar) अमोल मुजुमदारसोबत. शानदार कामगिरीनंतरही त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं स्वप्न अधुरच राहिलं.(Team India lost star Amol Mujumdar due to lack of opportunity to play in international cricket)

अमोल मुजुमदारने 1993-94 मध्ये रणजी करंडक स्पर्धेतून हरियाणाविरोधात प्रथम श्रेणी पदार्पण केलं. या पहिल्या सामन्यात त्याने 260 धावांची धमाकेदार द्विशतकी खेळी केली. प्रथम श्रेणी पदार्पणात मुजुमदारने वर्ल्ड रेकॉर्ड केला. विशेष म्हणजे आजही हा वर्ल्ड रेकॉर्ड कायम आहे. मुजुमदार फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत होता. यामुळे तो दुसरा तेंडुलकर म्हणून ओळखला जाऊ लागला. मुजुमदारची 19 वर्षाखालील वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली.

मुजुमदार आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) समवयस्क. दोघेही त्यावेळेस फर्स्ट क्लासमध्ये नावारुपास आले. दोघे 1995 मध्ये इंग्लंड ए विरुद्ध 3 अनधिकृत वनडे आणि कसोटी सामने खेळले. यामधील कसोटीमध्ये इंडिया ए संघाला 3-0 ने पराभव स्वीकारावा लागला. मुजुमदार फ्लॉप ठरला. तर द्रविड हीट ठरला. वनडे सीरिजमध्ये 2-1 ने विजय मिळवला. मुजुमदारने या एकदिवसीय मालिकेत 79 आणि 69 धावा केल्या. या इंग्लंड ए विरोधातील कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सौरव गांगुलीही होता. मात्र तो अपयशी ठरला.

इंग्लंड दौऱ्यासाठी रंगीत तालिम

यानंतर 1996 मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात येणार होती. या दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना संधी मिळण्याची चर्चा होती. याआधी 1995-96 मध्ये दुलीप करंडकाचे (Duleep Trophy) आयोजन करण्यात आले. या करंडकामधील कामगिरीच्या आधारवर इंग्लंड दौऱ्यात निवड करण्यात येणार होती. या स्पर्धेत मुजुमदारसह, द्रविड, गांगुली आणि व्ही व्ही लक्ष्मण (VVS Laxman) सहभागी झाले होते. यामध्ये लक्ष्मण हीट ठरला. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक 395 धावा केल्या. द्रविडने 353 धावा कुटल्या. तर मुजुमदारनेही 333 धावा केल्या. तसेच गांगुलीनेही 308 धावा केल्या. या चौकडीने प्रत्येकी 300 पेक्षा अधिक धावा केल्या. यामुळे चौघांच्याही इंग्लंड दौऱ्यासाठी आशा वाढल्या होत्या.

मुजुमदार यांना डच्चू

या दौऱ्यासाठी गांगुली आणि द्रविडची निवड करण्यात आली. द्रविड सातत्याने धावा करत होता. तर गांगुली डावखुरा असल्याने या दोघांना प्राधान्य देण्यात आले. मात्र मुजुमदारला अखेर संधी मिळाली नाही. त्याची थोडक्यात संधी हुकली. द्रविड आणि गांगुलीने या संधीचा पुरेपुर फायदा घेतला. या जोरावर त्यांनी संघातील स्थान निश्चित केलं.

मुजुमदार तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. मात्र या क्रमांकावर टीम इंडियामध्ये गांगुली, द्रविड आणि सचिन यांनी आपला दबदबा निर्माण केला होता. यामुळे मुजुमदार यांना संघात संधी मिळण्याची आशा धुसर झाली होती. पण पाचव्या क्रमांकासाठी मुजुमदार यांना संधी होती. पण लक्ष्मणने 2001 मध्ये लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 281 धावांची खेळी केली. यामुळे पाचव्या क्रमांकावर त्याने आपली दावेदारी सिद्ध केली. यामुळे मुजमदारच्या उरल्या सुरल्या आशाही मावळल्या.

मुंबईशी नातं तोडलं

चांगल्या कामगिरीनंतरही मुजुमदार यांच्यावर निवड समितीने विश्वास दाखवला नाही. यामुळे मुजुमदारने मुंबईकडून न खेळता आसाम त्यानंतर आसाम एलिट संघासाठी प्रतिनिधित्व केलं. यानंतर मुंबईकडून खेळण्याचे प्रयत्न केले. यासाठीही त्याला वर्षभर वाट पाहावी लागली. यामुळे आंध्रप्रदेशकडून खेळायला सुरुवात केली. 2012-13 च्या हंगामात त्याने 80 च्या सरासरीने जवळपास 1 हजार धावा केल्या.

क्रिकेट कारकिर्द

मजूमदारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्याने धावा केल्या. त्याने एकूण 171 सामन्यात 30 शतक आणि 60 अर्धशतकांसह 11 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या. 1993-94 ते 2002-03 दरम्यान त्याने 90 सामन्यात 50 पेक्षा अधिकच्या सरासरीने 6 हजार 51 धावा केल्या. मुंबई संघातील सहकारी वसीम जाफर, साईराज बहुतुले आणि निलेश कुलकर्णी यांना टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मात्र मुजुमदारच्या पदरी अखेरपर्यंत निराशाच पडली. टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळालीच नाही. यामुळे क्रिकेट विश्व एका दमदार फंलदाजाला मुकला.

“संधी न मिळाल्याने निराश होतो”

“रणजी स्पर्धेतील सुरुवातीच्या काही वर्षात मी 82 च्या सरासरीने धावा केल्या. यानंतरही निवड न झाल्याने मी फार निराश झालो होतो. यादरम्यान मी क्रिकेट सोडण्याचं ठरवलं. मी महिनाभर बॅटला हातही लावला नाही. अनेक सामन्यांमध्ये खेळलो नाही. हा सर्व प्रकार वडिलांनी पाहिला. यानंतर वडिलांनी माझी समज काढली. यानंतर मी पुन्हा जोमाने सुरुवात केली”, अशी प्रतिक्रिया मुजुमदार यांनी 2020 मध्ये फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनसोबत बोलताना दिली होती.

दरम्यान क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर मुजुमदार नव्या खेळाडूंना क्रिकेटचे धडे देत आहेत. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला स्पिनविरोधात फलंदाजी करण्याची धडे दिले आहेत. तसेच आयपीएलध्ये राजस्थान रॉयल्स संघाच्या बॅटिंग कोचची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

संबंधित बातम्या :

India vs England | ‘हा’ इंग्लिश फलंदाज सचिनचे रेकॉर्ड मोडणार : जेफ्री बॉयकॉट

(Team India lost star Amol Mujumdar due to lack of opportunity to play in international cricket)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.