WI vs IND | टीम इंडियाचा ‘तो’ स्टार खेळाडू अखेर परतलाच, वेस्ट इंडिजच्या गोटात खळबळ!

India Tour Of West Indies 2023 : वेस्ट इंडिज संघाच्या गोटात मात्र खळबळ उडाली आहे ती म्हणजे कायम त्यांचा कर्दनकाळ ठरत आलेल्या गोलंदाजाची टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली आहे.

WI vs IND | टीम इंडियाचा 'तो' स्टार खेळाडू अखेर परतलाच, वेस्ट इंडिजच्या गोटात खळबळ!
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 8:53 PM

मुंबई : बीसीसीआयने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीच्या टीम इंडियाची घोषणा केली आहे. येत्या 12 जुलैपासून या मालिकेला सुरूवात होणार असून 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 सामने पार पडले जाणार आहेत. टीम इंडियाच्या नेतृत्त्वाची धुरा रोहित शर्मा याच्याकडेच असणार आहे. वेस्ट इंडिज संघाच्या गोटात मात्र खळबळ उडाली आहे ती म्हणजे कायम त्यांचा कर्दनकाळ ठरत आलेल्या गोलंदाजाची टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली आहे. कॅरेबिअन बॅटींग लाईनअपला हा खेळाडू एकटा खिंडार पाडू शकतो. याआधीही त्याने अनेकवेळा ही कामगिरी करून दाखवली आहे.

कोण आहे तो खेळाडू?

वेस्ट इंडिजविरूद्ध टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये या खेळाडूने आपल्या कामगिरीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नलून स्टार खेळाडू युजवेंद्र चहल आहे. चहलने आयपीएलमध्येही झकास कामगिरी केली होती, 21 विकेट्स त्याने घेतल्या होत्या. आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीमध्ये चहल पाचव्या क्रमांकावर होता.

युजवेंद्र चहलने 75 टी-20 सामन्यांमध्ये 91 विकेट्स तर 72 एकदिवसीय सामन्यांमध्ये 121 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने 145 सामन्यात 187 विकेट घेतल्या असून आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे.

युजवेंद्र चहलची  वनडे मालिकेसाठी निवड झाली आहे. मात्र त्याची कसोटी खेळण्याची इच्छा होती. जी अजून लांबताना दिसणार आहे. वनडे आणि टी-20 मध्ये खूप खेळलो  मात्र कसोटीमध्ये इच्छा असल्याचं चहल म्हणाला होता. परंतु त्याची ही इच्छा अद्यापही  काही पूर्ण झाली नसून यासाठी त्याला आणखी  प्रतिक्षा करावी लागणार आहे.

बीसीसीआय निवड समितीने निवडलेला संघ

भारताचा कसोटी मालिकेसाठी संघ |रोहित शर्मा (C), अजिंक्य रहाणे (VC), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (W), इशान किशन (W), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.

भारताचा एकदिवसीय मालिकेसाठी संघ: रोहित शर्मा (C), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (W), हार्दिक पंड्या (VC), शार्दुल ठाकूर, आर. जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.