Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Aus : “पंत याने लायन, कुहनेमनला फोडलं असतं”, भारताची अवस्था पाहून ‘या’ खेळाडूला झाली आठवण!

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. हे पाहता

Ind vs Aus : पंत याने लायन, कुहनेमनला फोडलं असतं, भारताची अवस्था पाहून 'या' खेळाडूला झाली आठवण!
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 11:15 PM

Ind vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. कांगारूंना तिसरी कसोटी जिंकण्यासाठी फक्त 75 धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पाहता हे लक्ष्य काही फार अवघड नाही. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असून कधी काय होईल काही सांगता येत नाही. काहीतर चमत्कारच भारतीय संघाला वाचवू शकतो. भारतीय संघाचा दुसरा डाव 163 धावांवर आटोपला. भारताचा चेतेश्वर पुजारा सोडता इतर कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकता आलं नाही. याच पार्श्वभूमीवर एका खेळाडूला भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंतची आठवण झाली आहे.

स्पिनर्सविरूद्ध खेळायचं असेल तर ते तुम्ही ऋषभ पंतला विचारा. तुम्ही तुमच्या पायांचा जास्त वापर करा, बॉलच्या जवळ जा आणि मोठा शॉट खेळून बॉल सीमारेषेवर पाठवा. जर पंत असता तर त्याने लायन, कुहनेमनला फोडलं असतं आणि आपली लेंथ बदलायला भाग पाडलं असतं. भारतीय फलंदाजांनी आज एकदम निराशाजनक कामगिरी केल्याचं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने म्हटलं आहे.

इंदूर येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताला अवघ्या 109 धावांत गुंडाळण्यात लायन आणि कुहनेमन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. फिरकीपटू मॅथ्यू कुहनेमननेही कारकिर्दीतील पहिले पाच बळी मिळवले. भारताला इंदूरमध्ये पराभवाच्या गर्तेत ढकलण्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार आणि अनुभवी फिरकी गोलंदाज नॅथन लायन याचा मोठा वाटा राहिला. नॅथनने दुसऱ्या डावात 8 विकेट्स घेत टीम इंडियाला सुरुंग लावला.

नॅथन लायन इंदूर कसोटीतील पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 8 अशाप्रकारे एकूण 11 विकेट्स घेतल्या. लायन यासह बॉर्डर गावसकर ट्रॉफीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाची 88 धावांची आघाडी

टीम इंडियाला पहिल्या डावात 109 धावांवर गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ऑलआऊट 197 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 88 धावांची आघाडी मिळाली. तर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 88 धावांवर फक्त अधिकच्या 75 धावाच केल्या. त्यामुळे टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 76 धावांचेच आव्हान देता आले.

त्याआधी ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक 60 धावा केल्या. त्यानंतर मार्नस लाबुशेन 31, स्टीव्ह स्मिथ 26, कॅमरुन ग्रीन 21 आणि हॅन्डस्कॉम्बने 19 रन्स केल्या. तर टीम इंडियाकडून रविंद्र जडेजा याने 4, आणि आर अश्विन उमेश यादव यो दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाची पहिली इनिंग

कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र रोहितचा तो निर्णय चुकीचा ठरला. टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये 109 धावाच करता आल्या.

पहिल्या डावात टीम इंडियाकडून विराट कोहली 22, शुबमन गिल 21, श्रीकर भरत आणि उमेश या दोघांनी 17, अक्षर पटेल आणि रोहित शर्मा या दोघांनी प्रत्येकी 12 अशा धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू कुह्नमैन याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. नॅथन लायन याने 3 तर आणि मर्फीने 1 विकेट घेतली.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.