Mohammad Shami | मोहम्मद शमी याचा मोठा सन्मान, अर्जुन पुरस्कार जाहीर

mohammad shami arjuna award | टीम इंडियाच्या मोहम्मद शमी याच्यासह एकूण 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच 2 बॅडमिंटन खेळाडूंना खेळ रत्न पुरस्काराने सन्मानिक करण्यात येणार आहे.

Mohammad Shami | मोहम्मद शमी याचा मोठा सन्मान, अर्जुन पुरस्कार जाहीर
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 6:16 PM

मुंबई | क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून 2023 या वर्षासाठी क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुरस्कार आहे. तसेच इतर खेळाडूंनाही पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने त्याचं सोशल मीडियावर अभिनंदन केलं जात आहे. तसेच तो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. दरम्यान संबंधित खेळाडूने वर्षभर केलेल्या कामगिरीच्या जोरावर संबंधित खेळाडूंची पुरस्कारासाठी निवड केली जाते.

एकूण 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार

19 विविध खेळांमधील 28 खेळाडूंची अर्जुन आणि खेळरत्न पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. मोहम्मद शमी याच्यासह एकूण 26 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये विविध खेळातील मातब्बर खेळाडूंचा समावेश आहे. तसेच बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या दोघांना खेळ रत्न पुरस्कारने सन्मानित केलं जाणार आहे. या दोघांनी भारताचं नाव जगभरात गाजवलंय. चीनमध्ये झालेल्या एशियन गेम्स स्पर्धेत या जोडीने भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.  मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार हा गेल्या 4 वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला जातो.

मोहम्मद शमीचा गौरव

मोहम्मद शमी याने नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये धमाकेदार कामगिरी केली. शमीने 13 व्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्व विक्रम केला. मोहम्मद शमी एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन बीसीसीआयने शमीच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार शमीला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

कोणत्या खेळाडूला कोणता पुरस्कार?

पुरस्कार वितरण सोहळा केव्हा?

पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन राष्ट्रपती भवनात करण्यात आलं आहे. या पुरस्कार वितरण सोहळा 9 जानेवारी 2024 रोजी पार पडणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.