ICC Rankings | Mohammad Siraj नंबर 1, शाहीन अफ्रिीदी याची नाचक्की
Mohammad Siraj No 1 ICC Rankings | टीम इंडियाच्या शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज या दोघांनी पाकिस्तानला धोबीपछाड देत इतिहास रचला आहे.
मुंबई | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने वनडे रँकिंग जाहीर केली आहे. या वनडे रँकिंगमध्ये भारतीयांनी आपला डंका वाजवलाय. शुबमन गिल याने पाकिस्तानच्या बाबर आझम याला मागे टाकत फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळवलंय. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मिया मॅजिक अर्थात मोहम्मद सिराज याने पुन्हा नंबर 1 गोलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. मोहम्मद सिराज याआधीही तो अव्वलस्थानी पोहचला होता. मात्र त्याला ते स्थान गमवावं लागलं. मात्र आता पुन्हा सिराजने गमावलेलं पुन्हा मिळवलंय. तर पाकिस्तानचा फास्टर बॉलर शाहिन अफ्रिदी याची आठवड्याभरातच घसरगुंडी झालीय. शाहिन टॉपवरुन थेट खाली घसरलाय.
मोहम्मद सिराज याच्या नावावर आयसीसी वनडे रँकिंगमध्ये 709 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. सिराज याआधी 856 रेटिंग्स पॉइंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र सिराजने मोठी झेप घेतली. सिराजनंतर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज आहे. केशवच्या नावे 694 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा एडम झॅम्पा तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. झॅम्पा याआधी नवव्या स्थानी होता. झॅम्पाकडे 662 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.
टीम इंडियाचा ‘कुलदीप’ टॉप 5 मध्ये
टीम इंडियाचा चायनामॅन स्पिनर कुलदीप यादव यानेही भरारी घेतलीय. कुलदीप थेट 7 व्या क्रमांकावरुन थेट चौथ्या स्थानी येऊन पोहचला आहे. कुलदीप याआधी सातव्या क्रमांकावर होता. कुलदीपच्या नावावर आता 661 रेटिंग्स पॉइंट्स झाले आहेत. तर गेल्या आठवड्यात पहिल्या क्रमांकावर असलेला पाकिस्तानचा शाहीन अफ्रिदी डायरेक्ट पाचव्या क्रमांकावर येऊन घसरला आहे. शाहिनच्या नावावर गेल्या आठवड्यात 673 रेटिंग्स पॉइंट्स होते, त्यात आता कपात होऊन 658 झाले आहेत.
टॉप 10 मध्ये टीम इंडियाचे किती गोलंदाज?
More than the batsman,feel happy for the bowlers
4/5 in top 10 and 5/5 in top 20 🔥🔥#ICCRankings #CWC23 pic.twitter.com/77WzT4tkVv
— AB_Hi (@abhi_inthearc) November 8, 2023
मोहम्मद शमी याचंही प्रमोशन
दरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज याला टॉप 10 मध्ये एन्ट्री करण्यात यश आलंय. शमी 635 रेटिंग्ससह 10 व्या क्रमांकावर आला आहे. तर राशिद खान सातव्या, जसप्रीत बुमराह आठव्या, ट्रेन्ट बोल्ट नवव्या क्रमांकावर आहेत.