टीम इंडियाचा नवा फॉर्म्यूला, विराट आणि अक्षरला मोठी जबाबदारी
टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलीयाविरुद्धची सीरिज असून यातून विश्वचषकाचे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. यातच विराट कोहली चांगलाच फॉर्ममध्ये असल्याचं दिसतंय. तर चर्चा त्याच्या अनोख्या गोलंदाजीची देखील आहे. वाचा...
नवी दिल्ली : टी-20 (T20) विश्वचषकाची (Wold Cup) तयारी जोरदार सुरू असून टीम इंडियाचे खेळाडू सातत्यानं सराव करत आहे. काहीही झालं तरी टी-20 विश्वचषक जिंकायचंय, असं स्वप्न त्यांनी बाळगल्याचं दिसतंय. सरावही चालू आहे. सोशल मीडियावर चाहते देखील खेळाडूंकडून वेगवेगळ्या अपेक्षा व्यक्त करताना दिसत आहेत. यात विराट कोहली (Virat Kohli) ज्याचा फॉर्म आशिया चषकात दिसला.
आता विराटकडून देखील चांगल्याच आशा वाढल्या आहेत. त्यानं यावेळी काहीतरी अफलातून करावं किंवा मोठं यश मिळवावं, असं सोशल मीडियावर नेटिझन्सला वाटतंय. यातच विराट कोहलीचे काही फोटो देखील समोर आले आहेत.
हे फोटो पाहा
Look who’s opening bowling tomorrow ? #IndvsAus @imVkohli @BCCI #viratkohli #virat #kohli #cricket #fans #TeamIndia #India pic.twitter.com/bR2W9mqZD9
— Punjab Cricket Association (@pcacricket) September 19, 2022
विराट, अक्षरला मोठी जबाबदारी
सामन्याआधी विरोट कोहली गोलंदाजी करताना दिसला. तेही त्यानं जास्त वेळ गोलंदाजी केली. यातच अक्षर पटेल देखील दिसून आला. हा यावेळी उंचच उंच षटकार मारताना दिसून आला. यावरुन तुम्ही समजू शकता की टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड हे विराट कोहलीला गोलंदाजीसाठी देखील उतरवू शकतात.
रविंद्र जडेजाच्या जागी सहभागी अक्षर पटेल याला देखील मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. त्याला वेगळी भूमिका निभवावी लागू शकते, असं बोललं जातंय.
प्लेइंग इलेव्हनचा अंदाज
विश्वचषकाच्या प्लेइंग इलेव्हनचा अंदाज ऑस्ट्रेलीयाविरुद्धच्या सीरिजमधून येऊ शकतो. टीम इंडिया आशिया चषकात केलेली कोणतीही चूक पुन्हा करू इच्छित नाही. त्यामुळे यावेळी सगळं काही एकदम परफेक्ट असणार हे निश्चित.