टीम इंडियाचे नवीन हेड कोच गौतम गंभीर यांची पत्रकार परिषद अनेक अंगांनी खास होती. गंभीर अनेक मुद्यांवर मोकळेपणाने बोलले. त्याने रोहित-विराटच्या फ्यूचरवर मोठ वक्तव्य केलय. मोहम्मद शमीच्या पुनरागमनावरही स्टेटमेंट दिलय. वर्कलोड मॅनेजमेंट बद्दलच्या त्याच्या वक्तव्याने सगळेच हैराण झालेत. गंभीरने काही दिवसांपूर्वी वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल एक वक्तव्य केलेलं. ते व्हायरल झालेलं. पण यावेळच गौतम गंभीरच स्टेटमेंट पूर्णपणे वेगळं होतं.
गौतम गंभीरने वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत होतं. त्याने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हटलेलं की, “माझा इंजरी मॅनेजमेंटवर विश्वास नाहीय. जर, तुम्ही इंजर्ड झालात, तर जा रिकवर होऊन या. एकदम सिंपल गोष्ट आहे. इंटरनॅशनल क्रिकेट खेळताना तुम्ही शक्य तितक सर्व केलं पाहिजे. इंजरी कुठल्याही खेळाडूच्या करियरचा भाग असतो. तुम्ही तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळता, तेव्हा इंजर्ड होता. तुम्ही बाहेर जाऊन रिकवर होऊन टीममध्ये परत या. इंजरीचा विचार करुन, काही खेळाडूंना फक्त टेस्टसाठी राखून ठेवण्यावर माझा विश्वास नाहीय. तुम्ही चांगल्या फॉर्ममध्ये असाल, तर तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळा” असं गंभीर म्हणालेला.
गंभीर आज वेगळच बोलला
पण आज वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल गौतम गंभीर वेगळच बोलताना दिसला. जसप्रीत बुमराहबद्दल गंभीर म्हणाला की, “मी आधीच म्हणालोय, जसप्रीत बुमराह सारख्या प्लेयरसाठी वर्कलोड मॅनेजमेंट महत्त्वाच आहे. तो एक दुर्मिळ गोलंदाज आहे. जो कुठल्याही टीमसाठी खूप गरजेचा आहे. फक्त तोच नाही, अन्य वेगवान गोलंदाजांसाठी सुद्धा वर्कलोड मॅनेजमेंट महत्त्वाच आहे” टीम इंडियाला पुढच्या काही महिन्यात 10 टेस्ट मॅच खेळायच्या आहेत. गंभीरच्या दृष्टीने 10 टेस्ट मॅचसाठी जाडेजा महत्त्वाचा आहे. रवींद्र जाडेजाला वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत आराम देण्यात आलाय.
श्रीलंका दौरा कधीपासून?
टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात 27 जुलैपासून होणार आहे. दोन्ही टीम्स आधी तीन T20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे. त्यानंतर तीन वनडे सामन्यांची सीरीज होईल.