Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे याचे झुंजार शतक, बीसीसीआयकडे टीम इंडियाचे ठोठावले दरवाजे

Ajinkya Rahane Hundred : टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे याने सातासमुद्रापार शतक ठोकत टीम इंडियाचे दरवाजे ठोठावले आहेत. बांगलादेशविरूद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी रहाणे प्रयत्न करत आहे. शतकी खेळीनंतर त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळते की नाही पाहावं लागणार आहे.

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे याचे झुंजार शतक, बीसीसीआयकडे टीम इंडियाचे ठोठावले दरवाजे
Follow us
| Updated on: Sep 01, 2024 | 8:02 PM

गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियाचा खेळाडू अजिंक्य रहाणे टीममधून बाहेर आहे. टीममध्ये कमबॅक करण्यासाठी तो धडपड करत आहे. टीम इंडियाचा कर्णधार आणि उपकर्णधार राहिलेल्या अजिंक्यला आता टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी स्वत:ला सिद्धा करावं लागत आहे. अशातच मराठमोळ्या अजिंक्यच्या बॅटमधून झंझावती शतक आले आहे. या शतकासह अजिंक्य याने टीममध्ये आपल्या जागेसाठी दावा केला आहे. अजिंक्य याने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये लीसेस्टरशायरकडून खेळताना शतकी खेळी केली आहे.

अजिंक्य रहाणे याने 192 चेंडूंमध्ये 102 धावा केल्या. या संयमी शतकी खेळीमध्ये त्याने 13 चौकार आणि षटकार मारला. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 40 वे शतक होते. अजिंक्यने टीम अडचणीत सापडली असताना शतक करत डावाची धुरा सांभाळली. लीसेस्टरशायरच्या दुसऱ्य डावामध्ये 74 धावांत पहिल्या 3 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणे आणि पीटर हँड्सकॉम्ब यांनी चौथ्या विकेटसाठी 183 धावांची भागीदारी करत डाव सांभाळला. दोघांच्या शतकी खेळीमुळे लीसेस्टरशायरने पावनेतीनशेच्या आसपास धावा केल्या होत्या. लीसेस्टरशायरने पहिल्या डावात 252 धावा केल्या होत्या आणि त्यात रहाणेने 42 धावांचे योगदान दिले होते. तर ग्लॅमॉर्गनने पहिल्या डावात 9 गडी बाद 550 धावा करून डाव घोषित केला होता.

इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशिपमध्ये अजिंक्य रहाणे लीसेस्टरशायरकडून खेळत आहे. आपल्या संघासाठी खेळताना त्याने मॉर्गनविरुद्ध केलेल्या शतकी खेळीने टीम इंडियामध्ये परत एकदा आपल्या जागेसाठी दाव ठोकला आहे. येत्या 19 सप्टेंबरपासून टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने अजुनही टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. श्रेयस अय्यरची कामगिरी हवी तशी राहिलेली नाही. श्रीलंका दौऱ्यावर वन डे मालिकेत तो अपयशी ठरला होता. त्यामुळे बांगलादेशविरूद्धच्या मालिकेमध्ये रहाणेची निवड होऊ शकते.

दरम्यान, अजिंक्य रहाणे याने गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल सामना खेळला होता. आयीएलमध्ये सीएसकेकडून दमदार फलंदाजी करत त्याने टीम इंडियाममध्ये कमबॅक केलं होतं. त्यानंतर अजिंक्य रहाणे बाहेर पडल्यावर त्याला टीममध्ये जागा मिळाली आहे. त्यामुळे आता बीसीसीआय टीम इंडियाची घोषण करेल तेव्हा रहाणेला स्थान मिळते का नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.