IND vs SL | एकच क्राइम 10 वेळा, आपल्याच माणसांना का साथ देत नाही, रोहित शर्माचे ‘हे’ खेळाडू!

IND vs BAN : चुकीला माफी असं म्हटलं जातं पण भारतीय संघाचे खेळाडू एकच क्राईम दहावेळा करत आहेत. रोहित शर्माला त्याचे आपलेच सवंगडी साथ देत नसल्याचं दिसत आहे. असा नेमका कोणता क्राईम आहे जो संघातील रोहितचे जवळेच खेळाडू करत आहेत.

IND vs SL | एकच क्राइम 10 वेळा, आपल्याच माणसांना का साथ देत नाही, रोहित शर्माचे 'हे' खेळाडू!
Follow us
| Updated on: Sep 16, 2023 | 9:31 AM

मुंबई : आशिया कप 2023 मधील सुपर 4 फेरीमधील शेवटचा सामना भारतासाठी कान टोचून गेला. या सामन्यामध्ये भारतीय संघाचा 6 धावांनी पराभव झाला. भारतीय संघ आधीच फायनलमध्ये गेल्याने या पराभवाचा तसा काही फरक पडणार नाही. आशिया कपचा अंतिम सामना 17 सप्टेंबरला श्रीलंका संघासोबत होणार आहे. मात्र त्याआधी संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. एकच चूक एकदा-दोनदा नाहीतर तब्बल 10 वेळा करत असून याचा संघाला मोठा फटका बसत आहे. कर्णधार रोहित शर्मानेही आत हात टेकले आहेत कारण आशिया कपमध्ये याचाच फटका भारतीय संघाला अनेकवेळा बसला आहे.

नेमका काय आहे गुन्हा?

आशिया कपमध्ये ग्रुप स्टेज आणि सुपर4 फेरीमध्ये मिळून भारताने एकूण 5 सामने खेळले आहेत. यामधील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. पाचमधील चार सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. भारताची गोलंदाजी आणि फलंदाजी मजबूत आहे मात्र एक कमजोरी समोर येताना दिसत आहे. भारताचे खेळाडू गोलंदाजांना साथ देत नाहीयेत, कोणत्याही गोलंदाजाने कितीही धारदार बॉलिंग केली परंतु त्याला फिल्डरची साथ मिळाली नाहीतर गोलंदाजांचा आत्मविश्वास कमी होतो. क्रिकेटमध्ये गोलंदाजांना फिल्डरची साथ न मिळणं म्हणजे मोठा गुन्हा मानला जातो. पण आपल्या खेळाडूंनी तर हा गुन्हा एकदा दोनदा नाहीतर 10 वेळा केला आहे.

भारतीय संघाच्या खेळाडूंनी आशिया कपमध्ये अनेक चूका केल्या आहेत. मात्र यामधील फिल्डर्सने सोडलेले दहा कॅच हे जखमेवर मीठ चोळल्यासारखे होते. पाकिस्तानविरूद्धचा सामना सोडला तर भारतीय संघाने प्रत्येक सामन्यामध्ये एक-दोन तरी झेल सोडले आहेत. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी काही अप्रतिम झेल घेत सामना जिंकला होता. त्यावेळी गोलंदाजांना फिल्डर्सची मिळालेली साथ त्यासोबतच गोलंदाजांनी केलेला भेदक मारा याच्या जोरावर भारताने सामना जिंकत फायनलमध्ये धडक मारली होती.

दरम्यान, दुबळ्या नेपाळविरूद्धच्या सामन्यामध्ये भारतीय संघाने एक दोन नाहीतर चार कॅच सोडले. महत्त्वाचं म्हणजे कोहली आणि अय्यर यांनी एक-एक आणि इशान किशनने दोन कॅच सोडले होते. शुक्रवारी म्हणजे काल झालेल्या सामन्यामध्येही तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि के.एल. राहुल यांनी एक कॅच सोडले. शाकिब अल हसन याचा 28 धावांवर असताना सोडलेला झेल भारताच्या पराभवाचं कारण ठरला. वर्ल्ड कपमध्ये अशी गचाळ फिल्डिंग राहिली तर भारताला याचा फार मोठा बसू शकतो.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....