Rishabh Pant Car Accident : क्रिकेटपटूंच्या अपघातांची ‘मालिका’ सुरुच, आतापर्यंत कुणी कुणी गमावला जीव?
ऋषभ पंत (Rishabh Pant) कार अपघातात सुदैवाने बचावला. मात्र आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंचा कार अपघात मृत्यू झाला आहे.
Rishabh Pant : टीम इंडियाचा युवा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतच्या कारचा (Rishabh Pant Car Accident) शुक्रवारी 30 डिसेंबरला भीषण अपघात झाला. या अपघातात कारने पेट घेतला. गाडीचा चेंदामेंदा झाला. मात्र दैव बलवत्तर म्हणून पंत त्यातून सुदैवाने वाचला. मात्र पंतला या कार अपघातात जबर दुखापत झाली आहे. पंतच्या विविध अवयवांना गंभीर इजा झाली आहे. पंतचं नशीब म्हणून सर्व काही हे जखमेवरच निभावलं. मात्र याआधी अनेक क्रिकेटपटूंचा कार अपघात झाला आहे. दुर्देवाने या कार अपघातात एकही क्रिकेटपटू बचावला नाही. आतापर्यंत कोणत्या कोणत्या क्रिकेटरचं अपघाती निधन झालंय हे आपण या निमित्ताने जाणून घेणार आहोत. (team india rishabh pant car accident andrew symonds ben hollioake runako morton laurie williams tom maynard and dhrva pandav lost life in road accident)
ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराउंडर एँड्र्यू सायमंड्सचा 14 मे 2022 रोजी कार अपघातात मृत्यू झाला. सायमंड्सचा क्विसलँड शहरातील टाउन्सविले इथे कार रस्त्याच्या खाली पलटल्याने सायमंड्सला गंभीर दुखापत झाली यामुळे सायमंड्सचा अपघाती निधन झालं.
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू बेन हॉलिऑकचा मृत्यूही रस्ते अपघातात झाला होता. दुर्देवी बाब म्हणजे बेनचा वयाच्या अवघ्या 24 वर्षीचं निधन झालं. बेनने पर्थमध्ये गाडीवरील नियंत्रण गमावलं. त्यामुळे गाडी थेट भिंतीवर जाऊन आदळली. यात बेनचा मृत्यू झाला.
विंडिजचा अव्वल बॅट्समन रुनाको मॉर्टनलाही अपघातात जीव गमवावा लागला. रुनाकोचं निधन झालं तेव्हा त्याचं वय हे 33 वर्ष इतकं होतं. रुनाकोची गाडी त्रिनिदादमधील सॉलमॉन हायवेवरील एका पोलला जाऊन धडकली. रुनाकोने विंडिजसाठी 15 कसोटी, 56 वनडे आणि 7 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं.
विडिंजचा माजी ऑलराउंडर लॉरी विलियम्सचाही रस्ते अपघातात मृत्यू झाला. जमैकात लॉरीची गाडी ही समोरुन येणाऱ्या बसला जाऊन धडकली. ज्यात लॉरी आणि त्याच्या लहान भावाचाही मृत्यू झाला. लॉरी अवघ्या 33 वर्षांचा होता. लॉरीने विंडिजसाठी 15 एकदिवसीय सामने खेळले होता.
ग्लेमॉर्गनसाठी खेळणाऱ्या इंग्लिश क्रिकेटर टॉम मायनार्डचा एक्सीडेंटमध्ये मृत्यू झाला. टॉम हा नशेत होता ज्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पोलिसांना चकवा देण्याच्या प्रयत्नात ट्युब ट्रेनला जाऊन धडकली. यात टॉमचा मृत्यू झाला. टॉमचं निधन झालं तेव्हा तो 23 वर्षांचा होता.
भारतीय क्रिकेटरचंही अपघातात निधन झालं होतं. पंजाबचा प्रथम श्रेणी क्रिेकेटर ध्रुव पांडवचा 31 जानेवारी 1992 मध्ये अपघाती मृत्यू झाला. ध्रुव फक्त 18 वर्षांचा होता.