Rishabh Pant Accident ऋषभच्या रिकव्हरीला लागू शकतं एक वर्ष : एक्सपर्ट म्हणतात – विकेटकीपिंगमध्ये घुडघा, टाच आणि मनगट महत्वाचं, तिथे जखम असेल तर..

ऋषभ पंतला कार अपघातात (Rishabh Pant Car Accident) एकूण 5 ठिकाणी दुखापत झाली.

Rishabh Pant Accident ऋषभच्या रिकव्हरीला लागू शकतं एक वर्ष : एक्सपर्ट म्हणतात - विकेटकीपिंगमध्ये घुडघा, टाच आणि मनगट महत्वाचं, तिथे जखम असेल तर..
Follow us
| Updated on: Dec 30, 2022 | 7:03 PM

Rishabh Pant Accident : श्रीलंका विरुद्धच्या टी 20 आणि एकदिवसीय मालिकेतून बाहेर असलेल्या ऋषभ पंतला (Rishab Pant Accident)आणखी झटका बसला. ऋषभच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ऋषभला जबर दुखापत झाली. पंतला एकूण 5 ठिकाणी दुखापत झाली. माथा, उजवा मनगट, उजव्या पायाचा गुडघा, टाच आणि अंगठ्याचा समावेश आहे. गुडघा, टाच आणि मनगटाला झालेली दुखापतही चिंताजनक आहे. कारण विकेटकीपिंग करताना या अवयवांचा जास्तीत जास्त उपयोग होतो. (team india rishabh pant car accident cricketer may be given 1 year for recovery see experts what says)

पंतला झालेली दुखापत ही त्याच्या करिअरवर किती परिणामकारण ठरु शकते हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांसाठी संपर्क साधला. माजी विकेटकीपर नमन ओझा आणि स्पोर्ट्स मेडिसिन एक्सपर्ट यांच्याशी बातचीत केली. पंतला दुखापतीतून सावरण्यासाठी किती वेळ लागेल तसेच ती दुखापत किती गंभीर आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

“विकेटकीपिंग करताना गुडघा, टाच आणि मनगटाची सर्वाधिक हालचाल होते. त्यामुळे त्रास तर होणारच. पंत मैदानात कधीपर्यंत कमबॅक करु शकेल, याचा अंदाज हा एमआरआय रिपोर्ट पाहिल्यानंतरच बांधला जाऊ शकतो. ऋषभला या सर्व दुखापतीतून सावरण्यासाठी एक वर्ष लागू शकतो”, असं तज्ज्ञांनी म्हटलं.

हे सुद्धा वाचा

पंतचा एक्सरे रिपोर्ट

“गुडघ्याचं लिगामेंट फाटल्यास त्यातून सावरण्यासाठी वेळ लागतो. यासारख्या साधारण दुखापतीतून सावरण्यासाठी किमान 6-8 आठवड्यांचा वेळ लागतो. विकेटकिपींगमध्ये प्रत्येक पॉइंट निर्णायक ठरतो. दुखापत कुठेही होवोत, त्याचा त्रास तर जाणवतोच. मग ती अंगठीची दुखापत का असेना. पंतला मनगट, गुडघा आणि टाचेत अशा 3 जागांवर दुखापत झालीय. पंतला कमबॅकसाठी वेळ लागेलच. पण तो युवा आहे, पंत यातून लवकर सावरु शकतो “, असं नमन ओझाने स्पष्ट केलं.

Rishabh Pant Accident

“रिकव्हरीसाठी किमान 1 वर्ष लागेल”

“हाडाची दुखापत असती तर त्यातून सावरण्यासाठी 2-3 महिने लागतात. मात्र लिगामेंट फाटल्यास त्यातून फिट होण्यासाठी 6-9 महिन्याचा कालावधी लागताो. अशा प्रकारच्या दुखापतींना एशियल इंजरी म्हणतात जी सामन्यादरम्यान लागते”, असं टोकियो ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियासोबत स्पोर्ट्स मेडिसिन एक्सपर्ट म्हणून गेलेल्या डॉ रजत जांगिड म्हणाले.

rishabh pant treatment

“कार अपघातात सर्वसाधारणपणे लिगामेंट तुटतात किंवा अनेक लिगामेंट तुटण्याची शक्यता अधिक असते. यातून सावरण्यासाठी कधी कधी वर्षही लागू शकतो. विकेटकीपिंगबाबत म्हणायचं झालं तर टाच, गुडघा आणि पार्श्वभाग आणि विकेटकीपरची पोजिशन या बाबी म्हत्वाच्या आहेत. रिस्ट एलबो पंतच्या वर्किंग हँड (मुख्य हात) महत्तवपूर्ण आहे. पंतच्या मनगटाला आणि गुडघ्यालाही दुखापत आहे. अशात पंतला पूर्णपणे फिट होण्यासाठी वेळ लागू शकतो. मात्र अजून एमआरआय रिपोर्ट आलेला नाही. त्यामुळे पंतला दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी एकूण किती वेळ लागेल, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. मात्र गुडघ्याला 6-7 आणि मनगटाला 3-4 महिन्यांचा वेळ लागू शकतो”, असंही जांगिड यांनी स्पष्टपणे सांगितलं.

सर्व उपचार देणार : बीसीसीआय

“पंतच्या कपाळावर 2 ठिकाणी मार लागला आहे. उजव्या हाताच्या मनगटावर आणि घोट्यालाही दुखापत झालीय. पंतला झालेल्या दुखापतीची तीव्रता किती आहे हे एमआरआय रिपोर्टनंतरच स्पष्ट होईल. आम्ही सातत्याने वैदयकीय पथकाच्या आणि कुटुंबियांच्या संपर्कात आहोत. या अशा कठीण प्रसंगात आम्ही पंतसाठी आवश्यक ते सर्व उपचार देऊ आणि मदत करु”,असं बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.