Rohit Sharma ने वनडे-टेस्ट रिटायरमेंटबाबतही सांगितलं, म्हणाला.., पाहा व्हीडिओ

Rohit Sharma On Odi And Test Retirement: रोहित शर्माने टी 20 वर्ल्ड कप 2024 विजयानंतर सर्वात लहान क्रिकेट प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता रोहित वनडे आणि टेस्ट क्रिकेटबाबत काय म्हणाला?

Rohit Sharma ने वनडे-टेस्ट रिटायरमेंटबाबतही सांगितलं, म्हणाला.., पाहा व्हीडिओ
rohit sharma team india
Follow us
| Updated on: Jul 15, 2024 | 1:16 AM

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला 17 वर्षांनंतर टी 20 वर्ल्ड कप आणि 13 वर्षांनी आयसीसी ट्रॉफी मिळवून दिली. त्यानंतर रोहितने तडकाफडकी टी 20i क्रिकेटमधून निवृ्तीचा घोषणा केली. रोहितने एकाएकी निवृत्तीचा निर्णय घेतल्याने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. रोहितने सामन्यानंतर निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्याने त्याला निरोप देता आला नाही, अशी खंतही चाहच्यांनी बोलून दाखवली. मात्र दुसऱ्या बाजूला रोहितने वर्ल्ड कप विजयासह टी 20i क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचा आनंदही चाहत्यांना आहे. त्यानंतर आता रोहित शर्माने वनडे आणि कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

रोहितच्या टी20i निवृत्तीनंतर क्रिकेट चाहते हिटमॅनच्या वनडे आणि कसोटी कारकीर्दीबाबतही चर्चा करत आहेत. मात्र रोहित या दोन्ही फॉर्मेटमध्ये खेळत राहणार आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी काही दिवसांपूर्वीच रोहित चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत नेतृत्व करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे रोहित वनडे आणि टेस्टमध्ये नेतृत्व करणार असल्याचं स्पष्ट आहे. या दरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामध्ये रोहितने वनडे आणि टेस्टमधील निवृत्तिबाबतच्या प्लानवर उत्तर दिलं आहे.

रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहित टी 20 वर्ल्ड कपनंतर यूएसएमध्ये क्रिकेट अकदामीच्या उद्घाटनासाठी गेला आहे. रोहितला यावेळेस अनेक प्रश्नांची उत्तर दिली. “मी भविष्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. मी इतका पुढचा विचार करत नाही. त्यामुळे मला तुम्ही पुढे काही वेळ खेळताना पाहू शकाल”, असं रोहितने म्हटलं. रोहितच्या या प्रतिक्रियेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रोहितचा व्हीडिओ व्हायरल

दरम्यान रोहितने टी 20 वर्ल्ड कप विजयासह अनेक विक्रम आपल्या नावावर केले. रोहित आपल्या नेतृत्वात एकही सामना न गमावता टी 20 वर्ल्ड कप जिंकून देणारा पहिलाच कर्णधार आहे. तसेच रोहित टीम इंडियाला टी 20i क्रिकेटमध्ये 50 सामने जिंकून देणारा पहिलाच कर्णधार आहे. तसेच रोहितच्या नावावर टी20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. रोहितने त्याच्या टी20i कारकीर्दीतील 159 सामन्यांमध्ये 5 शतकं आणि 32 अर्धशतकांच्या मदतीने 4 हजार 231 धावा केल्या आहेत.

तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी.
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा.
बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर
बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर.
सांगलीत 23 फूटी फायबर गणेशा ठरला सर्वांचे आकर्षण
सांगलीत 23 फूटी फायबर गणेशा ठरला सर्वांचे आकर्षण.
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.