IND vs BAN : संजूचं शतक, सूर्याचं अर्धशतक, बांगलादेश विरुद्ध 297 धावांचा डोंगर, इंडिया किती रन्सने जिंकणार?
2nd Highest inning Total In T20i India vs Bangladesh : टीम इंडियाने बांगलादेशसमोर विजयासाठी 298 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाकडून संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या.
टीम इंडियाने टी20I क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. इंडिया टी20I मधील एका इनिंगमध्ये सर्वाधिक धावा करणारी टेस्ट प्लेइंग टीम ठरली आहे. तसेच इंडिया टी 20I फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी दुसरी टीम ठरली आहे. या फॉर्मेटमध्ये एका इनिंगमध्ये सर्वाधिक 314 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड हा नेपाळच्या नावावर आहे. नेपाळने 27 सप्टेंबर 2024 रोजी मोंगालिया विरुद्ध हा कारनामा केला होता. टीम इंडियाने बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 6 विकेट्स गमावून 297 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडून संजू सॅमसन याने सर्वाधिक शतकी खेळी केली. तर कॅप्टन संजू सॅमसन याने 75 धावांचं योगदान दिलं. हार्दिक पंड्याने 18 बॉलमध्ये 47 धावा केल्या. तर इतरांनीही या संधीचा फायदा घेत फटकेबाजी केली. आता टीम इंडिया हा सामना किती धावांनी जिंकते? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना आहे.
टीम इंडियाची बॅटिंग
टीम इंडियासाठी संजू सॅमसन याने विक्रमी शतकी खेळी केली. संजूने सर्वाधिक 111 धावा केल्या. संजूने 22 बॉलमध्ये अर्धशतक केलं.संजूने या दरम्यान सलग 4 चौकार ठोकले. त्यानंतर 40 चेंडूत शतक ठोकलं. संजूने या दरम्यान एकाच षटकात सलग 5 षटकार ठोकले. संजूचं हे टी 20i मधील पहिलंवहिलं आणि विक्रमी शतक ठरलं. संजू रोहित शर्मा (35) याच्यानंतर टी 20i मध्ये वेगवान शतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. संजूने याबाबतीत सूर्यकुमार यादवचा रेकॉर्ड ब्रेक केला. संजूने 47 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 11 फोरसह एकूण 111 धावा केल्या.
सूर्यकुमार यादवने 35 बॉलमध्ये 8 फोर आणि 5 सिक्ससह 75 रन्स केल्या. हार्दिक पंड्याने 18 चेंडूत 47 धावांची खेळी केली. रियान परागने 13 बॉलमध्ये 34 धावा ठोकल्या. रिंकु सिंह याने नाबाद 8 धावा केल्या. अभिषेक शर्माने 4 धावांचं योगदान दिलं. वॉशिंग्टन सुंदर 1 धाव करुन नाबाद परतला. तर नितीश रेड्डी याला भोपळा फोडता आला नाही. बांगलादेशकडून तांझिम हसन साकिबने 3 विकेट्स घेतल्या. तास्किन अहमद, मुस्तफिजुर आणि महमुदुल्लाह या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाच्या विक्रमी 297 धावा
Innings Break!
A batting exhibition from #TeamIndia as they post their Highest T20I total of all time 🔥🔥
India set a 🎯 of 298 for Bangladesh as @IamSanjuSamson top-scores with 111(47) 👏👏
Over to our bowlers 💪
Scorecard – https://t.co/ldfcwtHGSC#INDvBAN |… pic.twitter.com/SHDG8omeIu
— BCCI (@BCCI) October 12, 2024
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमान, लिटन दास (विकेटकीपर), तन्झिद हसन, तॉहिद हृदॉय, महमुदुल्ला, महेदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान आणि तांझिम हसन साकिब.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि मयंक यादव.