Team India | 2 कसोटी सामन्यांनंतर कारकीर्दीला ब्रेक, टीम इंडियाच्या खेळाडूची निवृत्ती
Indian Cricket Team | टीम इंडियाच्या एका खेळाडूने एकाएकी निवृत्तीचा निर्णय घेत खळबळ उडवून दिली आहे. या खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अवघ्या 2 सामन्यांची ठरली.
मुंबई | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना हा 7 मार्चपासून धर्मशालेत खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ धर्मशालेत दाखल झाले आहेत. टीम इंडिया विजयाचा चौकार लगावण्यासाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. या खेळाडूने अवघ्या 2 कसोटी सामन्यानंतर कारकीर्दीला ब्रेक लावण्याचा निर्णय घेत क्रिकेट चाहत्यांना झटका दिला आहे.
टीम इंडियात पुन्हा संधीच्या प्रतिक्षेत असलेल्या शाहबाज अहमदने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. शाहबाद टीम इंडियातून गेल्या 3 वर्षांपासून दूर होता. त्याला संधी मिळाली नाही. शाहबाजने 3 वर्ष संधीची प्रतिक्षा पाहिल्यानंतर अखेर कारकीर्दीला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला. शाहबाजच्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का लागला आहे.
शाहबाज नदीमची कारकीर्द ही औटघटकेची ठरली. शाहबाजला टीम इंडियाकडून फक्त 2 कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. शाहबाजने टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिके विरुद्ध 19 ऑक्टोबर 2019 रोजी कसोटी पदार्पण केलं. तर दुसरा सामना 13 महिन्यांनी 5 फेब्रुवारी 2021 रोजी खेळला. शाहबाजच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील हाच सामना अखेरचा ठरला. शाहबाजने 2 कसोटी सामन्यांमध्ये 8 विकेट्स घेतल्या.
शाहबाज अहमदचा क्रिकेटला रामराम
Shahbaz Nadeem has announced his retirement from professional cricket. pic.twitter.com/6IaFAsHmhJ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 5, 2024
दरम्यान शाहबाज अहमद याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शाहबाज अहमद याने 140 सामन्यांमध्ये 542 विकेट्स घेतल्या आहेत. शाहबाजने 28 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच नदीमने 7 वेळा 10 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. आता शाहबाज निवृत्ती घेतल्यानंतर विदेशात टी 20 लीग स्पर्धा खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे.