Shikhar Dhawan | एशियन गेम्ससाठी संधी न मिळाल्याने मला धक्का, शिखर धवन ऋतुराज गायकवाड याच्याबाबत काय म्हणाला?
Shikhar Dhawan On Asian Games 2023 | शिखर धवन याचं एशियन गेम्ससाठी कॅप्टन म्हणून नाव आघाडीवर होतं. मात्र त्याचा टीममधूनच पत्ता कट करण्यात आला.
मुंबई | क्रिकेट टीम इंडिया एशियन गेम्स 2023 मध्ये सहभागी होणार आहे. एशियन गेम्स स्पर्धेला 28 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या एशियन गेम्स स्पर्धेसाठी बीसीसीआयने 14 जुलैला 15 सदस्यीय संघ जाहीर केला. त्यानुसार एशियन गेम्समध्ये पुणेकर ऋतुराज गायकवाड याला प्रमोशन देण्यात आलं. एशियन गेम्समध्ये ऋतुराज गायकवाड टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तसेच अनेक युवा खेळाडूंचीही निवड करण्यात आली. एशियन गेम्समधील क्रिकेट सामने हे 20 ओव्हरचे असणार आहेत.
एशियन गेम्ससाठी टीम इंडियाचा गब्बर शिखर धवन याला कॅप्टन्सीची सूत्र देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र बीसीसीआयने ऋतुराजला पसंती दिली. कर्णधार म्हणून शिखर धवनचं नाव आघाडीवर होतं, पण त्याचा टीममध्येही समावेश करण्यात आला नाही. यावरुन शिखर धवन याने आता प्रतिक्रिया दिली आहे.
शिखर धवन काय म्हणाला?
एशियन गेम्ससाठी टीममध्ये निवड न झाल्याने मला धक्का बसल्याचं धवनने म्हटलं. मात्र असं असलं तरी मी पुन्हा जोमाने कमबॅक करेन, असा विश्वास शिखर धवन याने व्यक्त केला. धवनने पीटीआयला याबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळेस तो बोलता होता.
धवन एशियन गेम्सबाबत म्हणाला….
VIDEO | “I am keeping my fitness levels up and also working on my skills, I am ready as and when I get a recall to the Indian team,” Indian cricketer @SDhawan25 tells PTI. pic.twitter.com/dWOYPss5vK
— Press Trust of India (@PTI_News) August 10, 2023
“एशियन गेम्ससाठी माझी निवड झाली नाही, तेव्हा मला धक्का बसला. मात्र निवड समिताचा गेमप्लान काही वेगळा असेल, ते स्वीकार करावं लागेल. ऋतुराज गायकवाड टीम इंडियाची कॅप्टन्सी करणार आहे, याबाबत आनंदी आहे. अनेक यंगस्टर्स एशियन गेम्समध्ये खेळणार आहेत. ही नवी पोरं तिथे नक्कीच धमाकेदार कामगिरी करतील”, अशाही विश्वास धवनने व्यक्त केला.
“कमबॅकसाठी मी सज्ज”
“मी कमबॅकसाठी पूर्णपणे सज्ज आहे. कमबॅक करण्यासाठी मी स्वत:ला फीट आणि मेनटेन ठेवतोय. कमबॅकसाठी केव्हाही संधी मिळोत, मी सज्ज आहे”, असंही गब्बरने नमूद केलं.
टीम इंडिया | ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)
रिझर्व्ह प्लेअर | यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन.