Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill | टीम इंडिया अडचणीत, शुबमन गिल याचं बांगलादेश विरुद्ध झुंजार शतक

Shubman Gill Century | शुबमन गिल याने बांगलादेश विरुद्ध आर प्रेमदासा स्टेडियमवर टीम इंडिया अडचणीत असताना जबरदस्त शतक केलंय. शुबमनने बांगलादेशच्या गोलंदाजांना झोडून काढला.

Shubman Gill | टीम इंडिया अडचणीत, शुबमन गिल याचं बांगलादेश विरुद्ध झुंजार शतक
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 10:38 PM

कोलंबो | टीम इंडियाचा स्टार ओपनर बॅट्समन शुबमन गिल याने बांगलादेश विरुद्ध आशिया कप 2023 सुपर फोरमधील शेवटच्या सामन्यात झुंजार शतकी खेळी केली आहे. टीम इंडियाची 266 धावांचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात झाली. कॅप्टन रोहित शर्मा झिरोवर आऊट झाला. त्यानंतर डेब्युटंट तिलक वर्मा 5 धावांवर बाद झाला. केएल राहुल 19 रन्सची झुंजार खेळी करुन माघारी परतला. ईशान किशन 5 धावांवर बाद झाला.त्यामुळे टीम इंडियाची वाईट स्थिती झाली. टीम इंडियाचा टॉप आणि मिडल ऑर्डरने सपशेल निराशा केली. त्यामुळे टीम अडचणीत सापडली. मात्र शुबमन गिल याने एक बाजू धरुन ठेवत झुंजार शतक ठोकलंय.

शुबमनचं झुंजार शतक

शुबमन गिल याने 117 बॉलमध्ये 6 चौकार आणि 4 खणखणीत सिक्सच्या मदतीने हे शतक ठोकलं. शुबमनने 85.47 च्या स्ट्राईक रेटने या 100 धावा पूर्ण केल्या. शुबमनच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे पाचवं शतक ठरलं. शुबमन शतकानंतर आणखी आक्रमक झाला. शुबमनने शतक ठोकल्यानंतर जोरदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. शुबमनने मिळेल तिथे फटके मारले. मात्र शुबमनला हेच धाडस महागात पडलं. शुबमन मोठी खेळी करु शकला असता. मात्र तो फटकेबाजीच्या नादात आऊट झाला.

शुबमन गिल याचा तडाखा

महेदी हसन याने शुबमनला तॉहीद हृदाय याच्या कॅच आऊट केलं. शुबमनने 133 बॉलमध्ये 8 चौकार आणि 5 कडक सिक्सच्या मदतीने 121 धावांची खेळी केली. शुबमनच्या या झुंजार खेळीमुळे टीम इंडियाने 200 पार मजल मारली.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.

बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास (विकेटकीपर), तांझिद हसन, अनमूल हक, तॉहिद हृदॉय, शमीम होसेन, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, नसुम अहमद, तांझिम हसन शाकिब आणि मु्स्तफिजुर रहीम.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.