मुंबई | दक्षिण आफ्रिकेत महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत सोमवारी 20 फेब्रुवारी टीम इंडियाची स्टार फंलदाज सांगलीकर स्मृती मंधाना हीने आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात झंझावाती खेळी केली. स्मृतीने आयर्लंडच्या गोलंदाजांची पिसं काढली. स्मृतीने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. स्मृतीने केलेल्या या वादळी खेळीच्या जोरावर भारताला 150 पार मजल मारता आली. स्मृतीने या खेळीत अर्धशतक ठोकलं. त्यानंतर स्मृतीने टॉप गिअर टाकत जोरदार फटकेबाजी केली. स्मृतीला शतक करण्याची संधी होती. मात्र ती संधी थोडक्यात हुकली. मात्र नॅशनल क्रशने चाहत्यांची मनं जिंकली.
स्मृतीने 56 बॉलमध्ये 155.36 च्या कडक स्ट्राईक रेटने 9 चौकार आणि 3 गगनचुंबी सिक्सच्या मदतीने 87 धावांची धमाकेदार खेळी केली. स्मृतीच्या या खेळीमुळे आयर्लंडला 150 पेक्षा अधिक धावांचं आव्हान देता आलं.
दरम्यान टीम इंडियाने आयर्लंडला विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 156 धावा केल्या. टीम इंडियाकडून स्मृती मंधाना हीने सर्वाधिक 87 धावांची शानदार खेळी केली.
स्मृतीने 56 बॉलमध्ये 9 चौकार आणि 3 षटकारांसह ही खेळी केली. स्मृतीचं शतक अवघ्या 13 धावांसाठी हुकलं. पण तिच्या या खेळीच्या जोरावर भारताला 150 पार मजल मारता आली.
स्मृतीव्यतिरिक्त सलामीवीर शफाली वर्मा हीने 24 तर जेमिमाह रॉड्रिग्जने 19 धावांचं योगदान दिलं.कर्णधार हरमनप्रीत 13 धावा करुन माघारी परतली. दीप्ती शर्मा आणि तर रिचा घोष या दोघीही भोपळा फोडण्यातही अपयशी ठरल्या. तर आयर्लंडकडून कर्णधार लॉरा डेलनी हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
आयर्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन) | एमी हंटर, गॅबी लुईस, ओरला प्रेंडरगास्ट, एमियर रिचर्डसन, लुईस लिटिल, लॉरा डेलेनी (कर्णधार), आर्लेन केली, मेरी वॉल्ड्रॉन (कीपर), लेआ पॉल, कारा मरे आणि जॉर्जिना डेम्पसी.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन) | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), देविका वैद्य, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड आणि रेणुका ठाकूर सिंग.