Asia Cup 2023 | आशिया कपसाठी टीम इंडिया केव्हा जाहीर होणार? मोठी अपडेट समोर
Team India Squad For Asia Cup 2023 | आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. मात्र अजूनही टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही.
मुंबई | आशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार, हा गेल्या अनेक दिवसांपासून प्रश्न विचारला जात आहे. या 30 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया कपसाठी नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेश या 3 संघाची घोषणा करण्यात आली आहे. तर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि टीम इंडिया अजूनही वेटिंगवर आहेत. आधीच पाकिस्तानमध्ये स्पर्धेचं आयोजनावरुन चांगलाच वाद रंगला. आम्ही आमच्या खेळाडूंना पाकिस्तानमध्ये खेळायला पाठवणार नाहीत, अशी भूमिका बीसीसीआयने घेतली. त्यामुळे आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात विलंब झाला.
त्यानंतर आता टीम इंडियाने अजून संघाची घोषणा केलेली नाही. आता बीसीसीआय निवड समिती आशिया कपसाठी भारतीय संघ केव्हा जाहीर करणार आणि कुणाला संधी देणार, याबाबतीत मोठी माहिती समोर आली आहे.
टीम इंडियाची घोषणा केव्हा?
एका मीडिया रिपोर्ट्नुसार, आशिया कपसाठी 21 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. निवड समितीच्या बैठकीत कॅप्टन रोहित शर्मा उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. या टीममध्ये एकूण 15-17 खेळाडूंचा समावेश असू शकतो. या टीमवरुन आगामी वनडे वर्ल्ड कपचं चित्रही स्पष्ट होईल.
आशिया कपबाबत निवड समितीसमोर असंख्य प्रश्न आहेत. संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन आणि श्रेयस अय्यर यापैकी कुणाला घ्यायचं कुणाला नाही, ही सर्वात मोठी डोकेदुखी निवड समितीसमोर आहे.
आशिया कपचं पाकिस्तान आणि श्रीलंका या दोघांकडे संयुक्त यजमानपद आहे. स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध 2 सप्टेंबरला होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टीम इंडियाच्या 14 खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. तर काही खेळाडूंच्या निवडीवरुन सिलेक्शन कमिटीची डोकेदुखी वाढली आहे.
आशिया कपबाबत मोठी माहिती
Updates on Indian team for Asia Cup 2023: [News18]
– Selection on August 21st – Rohit Sharma to attend the meeting – KL Rahul is fit – Positive signs with Iyer but selection is not completely sure – Surya is the first choice if Iyer is not available – Talks about Tilak will… pic.twitter.com/FpR6W1RhjF
— Johns. (@CricCrazyJohns) August 18, 2023
या काही खेळाडूंमधून कुणाची निवड करायची, यासाठी 21 ऑगस्टला नवी दिल्लीत कॅप्टन रोहित शर्मा- निवड समिती यांच्यात एक बैठक पार पडणार आहे. या बैठकीतच इतर खेळाडूंचंही नाव निश्चित होईल.
केएल फीट श्रेयसचं काय?
टीम इंडियाचा ओपनर आणि विकेटकीपर केएल राहुल दुखापतीतून पूर्णपणे सावरला असल्याचं निश्चित समजलं जात आहे. पण श्रेयस अय्यर अजून पूर्णपणे फीट होऊ शकलेला नाही. दुर्देवाने श्रेयसच्या जागेवर सूर्यकुमार यादव याचा टीममध्ये समावेश केला जाऊ शकतो. तर संजू सॅमसन याचा पत्ता कट होऊ शकतो. संजूने विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेत फ्लॉप कामगिरी केली होती.
तिलक वर्मा याला संधी मिळणार?
तिलक वर्मा याने विंडिज विरुद्ध टी 20 मालिकेत धमाकेदार बॅटिंग केली होती. टीम इंडियाला मीडल ऑर्डरमध्ये आणखी एका सक्षम बॅट्समनची गरज आहे. त्यामुळे तिलकच्या नावाचा विचार होऊ शकतो.