ICC World Test Championship Final : पृथ्वी शॉला संधी मिळणार की नाही, भारतीय संघाच्या घोषणेची शक्यता

आयपीएलमध्ये पृथ्वी शॉ ची बॅट चांगलीच बोललीय. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी निवड समिती त्याला संधी देतेय का हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. ( Team India Squad For ICC World Test Championship Final 2021 hardik pandya Prithvi shaw)

ICC World Test Championship Final : पृथ्वी शॉला संधी मिळणार की नाही, भारतीय संघाच्या घोषणेची शक्यता
आयपीएलमध्ये पृथ्वी शॉ ची बॅट चांगलीच बोललीय. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी निवड समिती त्याला संधी देतेय का हे पाहणे महत्त्वाचं आहे.
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 12:19 PM

मुंबई : कोरोनाने क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री केल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचं 14 वं पर्व स्थगित करण्याची घोषणा केली. आयपीएल स्थगित झाल्यानंतर आता बीसीसीआयचे डोळे लागलेत ते आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यावर (ICC World Test Championship Final)…! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी आज भारतीय संघाच्या घोषणेची शक्यता आहे. त्यामध्ये आयपीएलच्या 14 व्या पर्वात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या मुंबईकर पृथ्वी शॉ ला संधी मिळणार की नाही?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

येत्या 18 ते 23 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड या उभय संघांमध्ये साऊथहॅम्पटन येथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळविला जाणार आहे. याच सामन्यासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती खेळाडूंची निवड करणार आहे.

मोठा संघ निवडण्यापाठीमागचं कारण?

या संघात चार सलामीवीर, चार ते पाच मधल्या फळीतील फलंदाज, आठ ते नऊ वेगवान गोलंदाज, चार ते पाच फिरकी गोलंदाज आणि दोन ते तीन विकेटकीपर असू शकतात. मोठा संघ निवडीपाठीमागचं कारण हेच आहे की अंतिम सामना खेळण्याअगोदर खेळाडू आपसात सराव सामने खेळू शकतील. आता निवड समिती केवळ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी संघ निवड करते की इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांसाठीही संघ निवड करते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

पृथ्वीला संधी मिळणार का?

भारतीय संघाचा तगडा बॅट्समन रोहित शर्माने ज्या प्रकारे इंग्लंडविरुद्ध बॅटिंग केलीय, त्यावरुन तो अंतिम सामना खेळणार असल्याचं निश्चित आहे. मुंबईकर पृथ्वी शॉने आयपीएलच्या 14 व्या पर्वात धडाकेबाज कामगिरी केलीय. त्याने 8 सामन्यांत तीन अर्धशतकांसह 308 धावा ठोकल्या. या पर्वात त्याची बॅट चांगलीच बोललीय. त्यामुळे निवड समिती त्याला संधी देतेय का हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळणार?

संघात इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे त्रिमुर्ती वेगवान गोलंदाज आहेत. याशिवाय मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूरलही संधी मिळू कते. तसंच 25 वर्षीय प्रसिद्ध कृष्णाने इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शानदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्यालाही संधी मिळणार का?, हे पाहणे महत्त्वाचं आहे.

हार्दिक पांड्याला डच्चू?

हार्दिक पांड्याचा सध्याचा फॉर्म ठीक नाहीय. तसंच गेल्या अनेक दिवसांपासून तो बोलिंगही करु शकत नाहीय. त्यामुळे संघातील त्याच्या समावेशाबाबत अनिश्चितता व्यक्त केली जातीय.

(Team India Squad For ICC World Test Championship Final 2021 hardik pandya Prithvi shaw)

हे ही वाचा :

कोरोनाबाधित माईक हसीला एअर अ‍ॅम्बुलन्सने दिल्लीहून चेन्नईला हलवलं

‘कोरोनाचा काळ कठीण, भारतीयांसाठी माझी वारंवार प्रार्थना’, दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूची इमोशनल पोस्ट वाचलीत?

भारताच्या धडाकेबाज क्रिकेटपटूवर दुःखाचा डोंगर, आईपाठोपाठ बहिणीचा कोरोनाने मृत्यू

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.