IND vs AUS | टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा तडकाफडकी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय!
हा स्टार क्रिकेटर गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. सातत्याने निवड समितीकडून या खेळाडूला संधी दिली जात नाही. या खेळाडूने आता सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला आहे.
चेन्नई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवणयात येत असलेली एकदिवसीय मालिका हा रंगतदार स्थितीत आहे. टीम इंडियाने या सारिजमधील सलामीचा सामना हा 5 विकेट्सने जिंकला. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. रविंद्र जडेजा आणि केएल राहुल हे दोघे विजयाचे शिल्पकार ठरले होते. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. मात्र त्यानंतर विशाखापट्टणम इथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात कांगारुंनी जोरदार कमबॅक केलं. या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 10 धावांनी धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. यामुळे तिसरा सामना हा रंगतदार स्थितीत पोहचला.
ऑस्ट्रेलियाने चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या सामन्यात टॉस जिकंला. ऑस्ट्रेलियाने ऑलआऊट 269 धावा केल्या. यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 270 धावांचं आव्हान मिळालं आहे. दरम्यान टीम इंडियाच्या एका खेळाडूने सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओमुळे क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली आहे. या खेळाडूची क्रिकेट कारकीर्द ही संपण्याच्या वाटेवर असल्याचं दिसून येत आहे. या व्हीडिओमुळे या खेळाडूने क्रिकेटला रामराम ठोकून सिनेसृष्टीत करिअर करण्याचा विचार केल्याचं वाटतंय.
आपण ज्या क्रिकेटरबद्दल बोलतोय तो दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन आहे. आपण शिखर धवन याच्याबाबत बोलत आहोत. शिखरने इंस्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. धवन या व्हीडिओत पोलिसाच्या वर्दीत दिसत आहे. शिखर शूटिंगमध्ये असल्याचं दिसत आहे.
गब्बर पोलीसाच्या भूमिकेत
View this post on Instagram
धवनची ही काही पहिली वेळ नाही. धवन याआधी बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हीच्यासोबत डबल एक्सएल या सिनेमात दिसला होता. या सिनेमात शिखरने क्रिकेटपटूची भूमिका बजावली होती. शिखरने इंस्टाग्रामवर केलेल्या या व्हीडिओमुळे त्याने क्रिकेटकडे दुलर्क्ष करुन सिनेमाकडे वळला असल्याचं लक्षात येत आहे. “आता काय क्रिकेट सोडून कायम सिनेमातच काम करणार का”, या आणि अशा अनेक कमेंट्स शिखरच्या व्हीडिओवर करण्यात आल्या आहेत.
दरम्यान शिखर क्रिकेटच्या मैदानातून गेल्या 3 महिन्यापासून दूर आहे. शिखरने अखेरचा एकदिवसीय सामना हा 2022 मध्ये बांगलादेश विरुद्ध खेळला होता. शिखरला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही संधी देण्यात आली नाही. त्यामुळे आता शिखर आयपीएलच्या 16 व्या मोसमातच खेळताना दिसणार आहे . या मोसमाला 31 मार्चपासून सुरुवात होत आहे.