ईशांतच्या पत्नीचा फोन आला अन् त्या प्रश्नामुळे मला वाटलं ऋषभ पंत गेला, टीम इंडियाच्या खेळाडूचा खुलासा
Rishbah Pant Accident : टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंत याच्या अपघाताला आज एक वर्षे पूर्ण होईल. या अपघातामधून तो वाचला, कारण पंत मृत्यूच्या दाढेतून माघारी आला होता. पण त्यावेळी टीम इंडियाच्या एका खेळाडूला वाटलं होतं की त्याचा मृत्यू झाला.
मुंबई : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत याच मागील वर्षी आजच्याच रात्री भयंकर अपघात झाला होता. दैव बलवत्तर म्हणून गडी अपघातात वाचला. टीम इंडियाचा भावी कॅप्टन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र याअपघातामुळे पंत क्रिकेटपासून वर्षेभर दूर राहिला. या घटनेला आज मध्यरात्री एक वर्षे पूर्ण होईल. पंतच्या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरली अन् सर्वांनाच धक्का बसला होता. त्यावेळी टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूला वाटलेलं की पंतचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. नेमकं काय झालं होतं जाणून घ्या.
कोण आहे तो खेळाडू?
दिल्ली कॅपिटल्स संघाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचा स्टार ऑल राऊंडर अक्षर पटेल असून तो पंतच्या अपघातानंतर सकाळी काय झालं ते सांगत आहे. पंतच्या अपघाताची बातमी सकाळी सकाळी फोनवर समजली, सात वाजले होते त्यावेळी प्रतिमा दीदीचा म्हणजे (ईशांत शर्माची पत्नी) फोन आला होता. मला विचारलं की, ऋषभ पंतसोबत काही बोलणं झालेलं का? यावर, नाही काल करणार होतो पण नाही केला. त्यानंतर माझ्याकडे ऋषभच्या आईचा नंबर ईशांतच्या पत्नीने मागितला आणि सांगितलं की त्याचा अपघात झाला आहे. हे ऐकून माझ्या मनात आलं की पंतचा त्या अपघातात मृत्यू झाला आहे, असं अक्षर म्हणाला.
मला सगळेच फोन करत होते की तुझ्याशी काही बोलणं झालं होतं का? सर्वांना वाटत होतं की तो माझ्याशी बोलला असावा. त्यानंतर मी पंतच्या मॅनेजरला फोन केला आणि चौकशी केली. त्यावेळी त्याने दुखापत किती झालीये याबाबत नेमकी माहिती नाही पण तो आता सुरक्षित असल्याचं मॅनेजरने सांगितल्याचं अक्षर पटेल याने व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
आजकाल बहुतेक लोकांना छोटसं दुखणं खूपच महागात पडताना दिसतं. त्यात काही लोक असे असतात जे छोटसं दुखणं म्हणून दुर्लक्ष करत असातात. पण नंतर तेच दुखणं त्यांच्यासाठी घातक ठरतं. तर असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा कान खूप दुखत होता. त्यामुळे ती घरीच कान साफ करून उपचार करत होती. पण नंतर तिची कानदुखी खूपच वाढली. त्यामुळे ती डॉक्टरांकडे गेली त्यावेळी डॉक्टरांनी तिचा कान चेक केला असता एक धक्कादायक गोष्ट उघडकीस आली जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
चेशायरमध्ये लूसी नावाची एक 29 वर्षीय महिला राहते. ही महिला तीन मुलांची आई आहे. तर ऑक्टोबरमध्ये लूसीच्या कानात खूप दुखत होतं. तसंच एके दिवशी तिच्या कानातून तिला थोडा आवाजही येत होता. त्यामुळे तिला तिच्या कानात काहीतरी गडबड असल्याचं जानवलं होतं. पण तिला वाटलं की कानात मळ झाला असेल त्यामुळे तसं होत असेल. पण काही दिवसांनंतर कानदुखी खूपच वाढली त्यामुळे लूसी डॉक्टरकडे गेली. तेव्हा डॉक्टरांनी तिचा कान चेक केला असता तिच्या कानात कोळी असल्याची धक्कादायक बाब समोर आली.
डॉक्टरांनी लूसीचा कान चेक केल्यानंतर समोर आलं की, तिच्या कानात फक्त कोळीच नव्हता तर त्या कोळीनं राहण्यासाठी तिच्या कानात जाळं बनवलं होतं. तसंच लूसीनं कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तिच्या कानात कोळी असेल. तिच्या कानातून कोळीला बाहेर काढताना तिला खूप त्रास झाला. तर कोळीला बाहेर काढताना लूसीला उलटी देखील झाली होती.
या धक्कादायक प्रकाराबाबत लूसीनं सांगितलं की, मी त्या कोळीला बाहेर काढण्यासाठी खूप तडफडत होते. आम्ही 111 आपत्कालीन नंबरवर कॉल केला आणि रूग्णालयात गेल्यानंतर माझ्या कानात गरम तेल टाकण्यात आलं आणि त्या कोळीला बाहेर काढण्यात आलं. त्या कोळीची उंची 1 सेंटीमीटर एवढी होती. तसंच लूसीच्या कानातून कोळीला बाहेर काढल्यानंतर तिच्या कानातून रक्तस्त्राव झाला, तसंच तिला नीट ऐकूही येत नव्हतं.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने जो व्हिडीओ शेअर केलाय त्यामध्ये पंतचा अपघात झाल्यानंतर ते आतापर्यंतच्या सर्व प्रवासाची माहिती दिली आहे. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य कोच रिकी पॉन्टिंगचाही समावेश आहे. आता पंत फिट झाला असून यंदाच्या पर्वामध्ये तो खेळणार असल्याचं बोललं जात आहे.