Team India चे दोन मॅचविनर मैदानात नाहीत दिसणार, मोठं कारण समोर
दोन्ही खेळाडू बाहेर बसल्याने टीम इंडियाला फार मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. कारण हे दोन्ही खेळाडू मॅचविनर असल्याने टीम इंडियासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
मुंबई : टीम इंडियाच्या अडचणी काही थांबताना दिसत नाहीयेत. दुखापतीमुळे दोन स्टार खेळाडू महत्त्वाच्या सामन्यांना मुकणार आहेत. टीम इंडियाची अफगाणिस्तानविरूद्धची मालिका होणार आहे. टीम इंडियाचे स्टार खेळाडू बाहेर झाले आहेत. दोन्ही खेळाडू बाहेर बसल्याने टीम इंडियाला फार मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. कारण हे दोन्ही खेळाडू मॅचविनर असल्याने टीम इंडियासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. दोन्ही खेळाडू थेट आयपीएल खेळताना दिसतील. कोण आहेत जाणून घ्या.
कोण आहेत दोन खेळाडू?
टीम इंडियाचा 360 म्हणून ओळखला जाणारा आणि टी-20 चा बादशहा सूर्यकुमार यादव याचा यामध्ये समावेश आहे. सूर्याने आफ्रिकेविरूद्धच्या टी-20 मालिकेमध्ये टीम इंडियाचं कर्णधारपदाची जबाबदारी पार पडली. टी-20 मालिका बरोबरीत पार पडली होती. तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये सूर्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे आता अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यातही तो खेळू शकणार नाही. त्यामुळे आता सूर्या थेट आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वर्ल्ड कपमध्ये पायाला दुखापत झालेला टीम इंडियाचा स्टार ऑल राऊंडर हार्दिक पंड्या दुखापती झाला होता. पंड्याने अजुनपर्यंत मैदानात उतरला नाही. अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेत हार्दिककेड कॅप्टन असणार होतं. मात्र तोसुद्धा खेळतो की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे हार्दिक पंड्यासुद्धा आता थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो.
दरम्यान, टीम इंडिया 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामने आणि त्यानंतर 11 जानेवारीपासून घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. अशा स्थितीत या दोन स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत टी-20 संघाची निवड रंजक होण्याची अपेक्षा आहे.