R Ashwin Retirement | अखेर आर अश्विन निवृत्तीबाबत जाहीरपणे बोलला

Ravichandran Ashwin on Retirement | आर अश्विन याचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यासाठी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नव्हता.

R Ashwin Retirement | अखेर आर अश्विन निवृत्तीबाबत जाहीरपणे बोलला
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 6:51 PM

मुंबई | आर अश्विन याची अनुभवी गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. अश्विन याने टीम इंडियाने अनेक सामने जिंकून दिले आहेत. अश्विनमध्ये बॉलिंगसह बॅटिंग करण्याची क्षमता आहे. अश्विनने वेळोवेळी आपल्या बॅटिंगमधून ते सिद्धही करुन दाखवलंय. अश्विनची क्रिकेट कारकीर्द अखेरच्या टप्प्यात असल्याचं म्हटलं जात आहे. अश्विनचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियात प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नव्हता. अश्विनला संधी न दिल्याने आजी माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. आता स्वत: अश्विनने मोठा खुलासा केला आहे.

टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अश्विनला टीममधून बाहेर ठेवल्या कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड या दोघांवर सडकून टीका करण्यात आली. या सामन्यात अश्विनच्या जागी रविंद्र जडेजा याचा समावेश करण्यात आला होता. वर्ल्ड क्रिकेटमधील नंबर 1 बॉलरला टीममधून बाहेर कसं काय ठेवू शकता, असा सवालही क्रिकेट चाहत्यांनी उपस्थित केला.

अश्विनने आता या सर्व विषयांवर मौन सोडलंय. “ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये खेळायला मला आवडतं असतं. कारण मी टीमला तिथवर पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावलीय. मी 2021 मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप फायनलध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या”, असं अश्विन म्हणाला होता. टीम इंडियाला 2021 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभूत व्हावं लागलं होतं.

हे सुद्धा वाचा

निवृत्तीबाबत काय म्हणाला?

दरम्यान अश्विनने धक्कादायक खुलासा केला. “बॉर्डर गावसकर ट्रॉफीनंतर निवृत्ती घेण्याचं मी ठरवलं होतं. माझ्या मनाची तयारी झाली होती”, असंही अश्विनने म्हटलं. अश्विनने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत 25 विकेट्स घेतल्या होत्या. अश्विनला या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द सीरिज’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

“मी बांगलादेशवरुन घरी परतलो. त्यानंतर मी पत्नीला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर निवृत्त होऊ शकतो असं म्हटलं. मी गुडघ्याच्या दुखापतीचा त्रास सहन करत होतो. मला माझ्या एक्शनमध्य बदल करायचा होता. मला बॉल टाकल्यानंतर त्रास व्हायचा”, असंही अश्विनने स्पष्ट केलं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.