India vs England | टीम इंडियाचा नेट्समध्ये जोरदार सराव, इंग्लंड विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज

बीसीसीआयने (BCCI) सरावादरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.

India vs England | टीम इंडियाचा नेट्समध्ये जोरदार सराव, इंग्लंड विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज
विराट कोहली आणि इशांत शर्मा
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 12:01 PM

चेन्नई : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी (India vs England) आता काही तास शिल्लक राहिले आहेत. टीम इंडिया आणि इंग्लंड दोन्ही संघ आमनेसामने भिडण्यासाठी सज्ज आहेत. कोरोनानंतर जवळपास वर्षभरानंतर टीम इंडिया भारतात खेळणार आहे. स्टेडियमच्या (MA Chidambaram) एकूण क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांनाही उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान टीम इंडियाने 1 फेब्रुवारीला मैदानात या कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर जोरदार सराव केला. बीसीसीआयने (BCCI) सरावादरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. (team india starts nets practise in chennai for england test series)

टीम इंडियाचा क्वारंटाईन कालावधी सोमवारी संध्याकाळी पूर्ण झाला. तसेच सर्वच खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह आला. यामुळे बीसीसआयने त्यांना सराव करण्याची परवानगी दिली. टीम इंडिया 27 जानेवारीपासून चेन्नईतील (Chennai) लिला हॉटेलमध्ये क्वारंटाईन होती. बीसीसाआयने शेअर केलेल्या फोटोमध्ये कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर दिसत आहेत. विशेष म्हणजे ट्रेनिंग सेशनमध्ये टीम इंडियाचे खेळाडूंनी नवी जर्सी परिधान केली होती.

महत्वाच्या खेळाडूंचे पुनरागमन

या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, केएल राहुल, इशांत शर्मा, हार्दिक पंड्याचं पुनरागमन झालं आहे. दुखापतीमुळे केएल राहुल आणि इशांत शर्माला ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेला मुकावे लागले होते. तर पहिल्या कसोटीनंतर विराट मायदेशी परतला होता. तसेच इंग्लंडच्या खेळाडूंनाही सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. टीम इंडियाने कांगारुंचा त्यांच्याच भूमित कसोटी मालिकेत पराभव केला. तर इंग्लंडनेही श्रीलंकेवर 2-0 एकतर्फी फरकाने टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळवला.

दरम्यान या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. यामधील पहिले 2 सामने हे चेन्नईतील चेपॉक स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहेत. तर उर्वरित 2 सामन्यांचं आयोजन हे अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये केलं आहे.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना-चेन्नई-5-9 फेब्रुवारी दूसरा सामना – चेन्नई-13ते17 फेब्रुवारी तिसरा सामना-अहमदाबाद- 24 ते 28 फेब्रुवारी चौथा सामना-अहमदाबाद-4 ते 8 मार्च

पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.

संबंधित बातम्या :

India vs England 2021 | क्रिकेट चाहत्यांसाठी गुड न्यूज, स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामना पाहता येणार

England Tour India | इंग्लंडच्या भारत दौऱ्याची घोषणा, ‘या’ 3 स्टेडियमध्ये खेळण्यात येणार सामने

India vs England | इंग्लंडचा कसोटी मालिकेत 3-0 ने पराभव होणार, गौतम गंभीरची भविष्यवाणी

(team india starts nets practise in chennai for england test series)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.