Suryakumar Yadav: वनडे फॉर्मेटपासून दूर, सूर्यकुमारकडून खंत व्यक्त, म्हणाला….

Team India Suryakumar Yadav: टीम इंडियाचा टी20i कॅप्टन सूर्यकुमार यादव याने आपल्या मनातलं सारं काही सांगून टाकलं आहे. सूर्याने नुकतंच कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या टी 20i मालिते श्रीलंकेविरुद्ध 3-0 अशा फरकाने जिंकून दिलं होतं.

Suryakumar Yadav: वनडे फॉर्मेटपासून दूर, सूर्यकुमारकडून खंत व्यक्त, म्हणाला....
Suryakumar Yadav indian cricket team
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 7:03 PM

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत आयसीसी टी 20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. सूर्यकुमार यादव याने अप्रतिम रिले कॅच घेत भारताला विश्व विजेता करण्यात निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर सूर्यकमार यादवला टी 20 फॉर्मेटचा पूर्ण वेळ कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं. सूर्याने आपल्या नेतृत्वातील पहिल्या टी20i मालिकेत भारकाला श्रीलंकेविरुद्ध 3-0 असा क्लीन स्वीपने विजय मिळवून दिला. मात्र सूर्याची श्रीलंके विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत निवड करण्यात आली नाही. सूर्याने आता त्यावरुन मनातली खदखद बोलून दाखवलीआहे.

सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

सूर्यकुमार यादव आता सरफराज खान याच्या नेतृत्वात बूची बाबू स्पर्धेत मुंबईचं प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेआधी सुर्यकुमार यादवने टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधला. सूर्या या दरम्यान खूप काही बोलला. सूर्याने या दरम्यान टीम इंडियासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली. सूर्या सध्या टी 20 फॉर्मेटमध्ये खेळतोय. सूर्याने आतापर्यंत फक्त 1 कसोटी तर 37 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

“मी भारतासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळू इच्छितो. तसेच बूची बाबू स्पर्धेत खेळल्याने माझा कसोटी क्रिकेटसाठी आवश्यक सराव होईल”, असा आशावाद सूर्यकुमारने टीओआयसोबत बोलताना व्यक्त केला.

सूर्याचं कसोटीत कमबॅक करण्याचं लक्ष्य

सूर्यकुमारची टी20i कर्णधारपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे सूर्या आता टी 20i संघात असणार हे निश्चित झालं आहे. मात्र सूर्याला अद्याप कसोटी आणि एकदिवसीय संघात आपलं स्थान निश्चित करण्यात यश आलेलं नाही. सूर्याने 37 वनडेमध्ये 773 धावा केल्या आहेत. तर एकमेव कसोटी सामन्यात त्याला केवळ 8 धावांपर्यंतच पोहचता आलं आहे. तर टी20i मधील 71 सामन्यात सूर्याने 2 हजार 432 धावा केल्या आहेत.

बूची बाबू स्पर्धेबाबत थोडक्यात

दरम्यान बूची बाबू स्पर्धेला 15 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर 11 सप्टेंबरला स्पर्धेची सांगता होणार आहे. या स्पर्धेतू लोकल बॉल सरफराज खान हा मुंबईचं नेतृत्व करणार आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.