टी-20 विश्वचषकात ‘या’ खेळाडूला संधी, आशिया चषकातील चुका टाळणार

ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबर ते 13 नव्हेंबरदरम्यान टी-20 विश्वचषक होणार आहे. या विश्वचषकाची चाहते आणि क्रीडाप्रेमी वाट पाहतायत. सध्या विश्वचषकाची जोरदार तयारी सुरू असून टीम इंडियाच्या घोषणेकडं लक्ष लागून आहे.

टी-20 विश्वचषकात 'या' खेळाडूला संधी, आशिया चषकातील चुका टाळणार
भारतीय क्रिकेट संघImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 8:01 PM

नवी दिल्ली : आशिया चषकातील (Asia Cup 2022) चूक पुन्हा T-20 विश्वचषकात (T20 world cup) होऊ नये, यासाठी भारतीय क्रिकेट संघ (Team India) खबरदारी घेताना दिसत आहे. यासाठी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार, कोणत्या खेळाडूला गाळलं जाणार, याच्याही चर्चा सध्या रंगल्या आहेत. दरम्यान, जोपर्यंत बीसीसीआय (BCCI) अंतिम मोहर लावत नाही म्हणजे जोपर्यंत T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करत नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी जर-तरच्याच आहेत. दरम्यान, आशिया चषकात टीम इंडियाची निराशा झाल्यानं T20 विश्वचषकात टीम इंडिया कोणतीही कसर सोडणार नाही, असंच दिसतंय. भारतीय क्रिकेट संघानं आशिया चषकात काही खेळाडूंना संधी न देऊन मोठी चूक केली होती, ती चूक आता सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

16 सप्टेंबरला टीमची घोषणा?

16 सप्टेंबरला टी-20 विश्वचषकाची घोषणा होणार आहे. तर ही विश्वचषक 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियात खेळवलं जाणार आहे. दरम्यान, या सगळ्यात आता टीम इंडियात कोणत्या खेळाडूंचा समावेश असणार याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे.

ही चूक टाळली जाईल?

आशिया चषकातील एका चुकीबद्दल बोलायचं झाल्यास आशिया चषकासाठी निवडलेल्या संघात स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संधी न देऊन भारतीय संघानं मोठी चूक केली होती. संजू सॅमसन ज्या पद्धतीनं क्लीन सिक्स मारतो, तशी क्षमता फारच कमी टीम इंडियाच्या फलंदाजांमध्ये आहे. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे आणि कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन खेळाडूंची टीम अधिक चांगल्या पद्धतीनं तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. संजू सॅमसन मधल्या फळीत उतरतो आणि फलंदाजीत मोठे फटके मारतो संजू सॅमसन यष्टिरक्षणात माहिर आहे आणि बॅटने तो चांगलीच जादूही दाखवतो.

संजूला असं म्हटलं जातंय….

संजू सॅमसन टीम इंडियासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो, असंही बोललं जातंय. संजू सॅमसन सुरुवातीला क्रीजवर राहून आपला डाव पुढे सरकवतो, नंतर धोकादायक फॉर्म घेतो आणि प्रतिस्पर्धी संघावर हल्ला करतो.

ऋषभ पंतचं काय?

भारताला यंदाचा टी-20 विश्वचषक जिंकायचा असेल तर ऋषभ पंतला वगळावं लागेल, असंही काही क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी मत व्यक्त करतायत. ऋषभ पंतबद्दल बोलायचं तर तो टी-20 फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी योग्य दिसत नाही. त्यामुळे टी-20 विश्वचषकात ऋषभ पंतला टीम इंडियातून वगळून संजू सॅमसनला संधी द्यावी लागणार आहे. ऋषभ पंतचा कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. पण टी-20 क्रिकेटमध्ये तो संजू सॅमसनसारखा प्रभावी खेळाडू म्हणून दिसला नाही, त्यामुळे आता बीसीसीआय काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागून आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.