Retirement: रोहित-विराट आणि जडेजानंतर बुमराहची टी20i निवृत्तीबाबत प्रतिक्रिया, काय म्हणाला?

Jasprit Bumrah On Retirement: टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनी निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता जसप्रीत बुमराह याने निवृत्तीाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Retirement: रोहित-विराट आणि जडेजानंतर बुमराहची टी20i निवृत्तीबाबत प्रतिक्रिया, काय म्हणाला?
Jasprit Bumrah On Retirement
Follow us
| Updated on: Jul 04, 2024 | 11:08 PM

टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात पराभूत करत वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्यानंतर टीम इंडिया 4 दिवसांनी बारबाडोसहून राजधानी नवी दिल्लीत आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी याची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया मुंबईला रवाना झाली. रोहितसेना संध्याकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाली. टीम इंडिया तिथून खासगी बसने मरीन ड्राईव्ह परिसरात आली. त्यानंतर टीम इंडियाची नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम अशी विजयी मिरवणूक काढण्यात आली. ओपन डेक बसमधून टीम इंडियाच्या खेळाडूंची ही मिरवणूक काढली गेली. टीम इंडियाच्या खेळाडूंना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी तोबा गर्दी केली. जवळपास 2 तासांच्या या विजयी मिरवणुकीनंतर टीम इंडियाचा ताफा वानखेडे स्टेडियममध्ये पोहचला.

वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियाचं ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं. टीम इंडिया स्टेडियममध्ये पोहचताच नाचू लागली. त्यानंतर राष्ट्रगीताने निरोप समारंभाला सुरुवात झाली. कॅप्टन रोहित शर्मा, हेड कोच राहुल द्रविड, विराट कोहली आणि अखेरीस जसप्रीत बुमराहने आपलं मनोगत व्यक्त केलं. यॉर्करकिंग जसप्रीत बुमराहने मनोगत व्यक्त करताना निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली.

बुमराहची निवृत्तीबाबत एका वाक्यात प्रतिक्रिया

टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कप विजायनंतर काही मिनिटांनी विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी टी20i मधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. तर त्यानंतर काही तासांनी ऑलराउंडर रवींद्र जडेजानीही टी20i क्रिकेटला रामराम केला. या तिघांनी टी20i क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी योगदान दिलं. मात्र वर्ल्ड कप विजयानंतर इथेच थांबण्याचा निर्णय केला. जसप्रीत बुमरानेही या वर्ल्ड कपमध्ये बॉलिंगने धारदार कामगिरी केली. बुमराहने 8 सामन्यात घेतलेल्या 15 विकेट्ससाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. विजयी मिरवणुकीनंतर जसप्रीत बुमराहला निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला. बुमराहने यावर प्रतिक्रिया दिली. “माझ्या निवृत्तीला आता बराच वेळ आहे. मी तर आता सुरुवात केली आहे”, असं बुमराहने म्हटलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.