England Tour India | टीम इंडिया इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका 3-1 ने जिंकणार, ब्रॅड हॉगची भविष्यवाणी

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे.

England Tour India | टीम इंडिया इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका 3-1 ने जिंकणार, ब्रॅड हॉगची भविष्यवाणी
टीम इंडिया
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 7:48 PM

मुंबई : इंग्लंडचा संघ अवघ्या काही दिवसांनी टीम इंडियाच्या दौऱ्यावर ( England Tour India 2021) येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड टीम इंडियाविरुद्ध कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. एकूण 4 सामन्यांची ही टेस्ट सीरिज असणार आहे. टीम इंडिया ही कसोटी मालिका जिंकेल, अशी भविष्यवाणी ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटु ब्रॅड हॉगने (Brad Hogg) केली आहे.  (Team India to win Test series against England predicts former Australia spinner Brad Hogg)

हॉग काय म्हणाला?

टीम इंडिया ही मालिका 3-1 किंवा 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकेल, असं हॉग म्हणाला. हॉग त्याच्या युट्युब चॅनेलवर बोलत होता. यावेळेस त्याने या मालिकेबाबत भविष्यवाणी केली. टीम इंडिया चेन्नईमधील पहिल्या 2 कसोटीत विजय मिळवेल. इंग्लंड तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करत सामना जिंकेल. पण चौथ्या सामन्यात भारत विजयासह मालिकाही जिंकेल, असंही हॉगने म्हटलं.  तसेच हॉगने यावेळेस कर्णधार विराट कोहलीची पाठराखण केली.

गेल्या काही दिवसांपासून विराटऐवजी अजिंक्य रहाणेला कर्णधार करा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. पण विराटच कर्णधार रहायला हवा, असं म्हणत हॉगने विराटची पाठराखण केली आहे. “विराट फार चांगला फलंदाज आहे. तो चांगली बॅटिंग करतो. विराटला कर्णधारपदावरुन हटवलं तर त्याचा टीम इंडियाच्या परंपरेवर आणि विराटवरही परिणाम होईल”, अशी भिती हॉगने व्यक्त केली.

इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिले 2 सामने चेन्नईत खेळण्यात येणार आहेत. तर त्यानंतरचे 2 सामने अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहेत. हा तिसरा सामना (Day-night)असणार आहे. दरम्यान पहिल्या 2 कसोटींसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे.

टेस्ट सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

पहिल्या 2 टेस्टसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जैक लीच.

संबंधित बातम्या :

Rishabh Pant | “रिषभ पंत मॅचविनर खेळाडू, त्याला वनडे आणि टी 20 मध्ये संधी द्यायला हवी”

स्टम्पच्या मागे उभा राहून रिषभ पंत नेमकं काय गात होता; व्हिडीओ व्हायरल

(Team India to win Test series against England predicts former Australia spinner Brad Hogg)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.