Hardik Pandya ने इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय, आयसीसीची घोषणा
Team India Hardik Pandya: हार्दिक पंड्याला आयसीसीकडून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी मिळाली आहे.
टीम इंडियाने 17 वर्षांनी रोहित शर्माच्या नेतृत्वात आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला. भारतीय संघाने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूने उल्लेखनीय कामगिरी केली. प्रत्येक सामन्यात वेगवेगळा खेळाडू हा मॅचविनर ठरला. संपूर्ण स्पर्धेत ऑलराउंडर्स खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. प्रामुख्याने अक्षर पटेल आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या या जोडीने बॅटिंग आणि बॉलिंगने धमाका केला. आता वर्ल्ड कप विजयानंतर हार्दिक पंड्याचा आनंद द्विगुणित झाला आहे. आयसीसीने हार्दिकला आनंदाची बातमी दिली आहे. हार्दिक आयसीसी टी 20 ऑलराउंडर रँकिंगमध्ये सर्वांना मागे टाकत नंबर 1 ठरला आहे. आयसीसीने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे.
आयसीसीने टी20आय रँकिंग जारी केली आहे. त्यानुसार, हार्दिकने अष्टपैलूंच्या क्रमवारीत 2 स्थानांची झेप घेतली आहे. हार्दिकने यासह आता रँकिंगमध्ये श्रीलंकेच्या वानिंदु हसरंगासह संयुक्तरित्या नंबर 1 ऑलराउंडर ठरला आहे. हार्दिक आणि वानिंदु या दोघांच्या खात्यात प्रत्येकी 222 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. हार्दिक नंबर 1 ऑलराउंडर ठरणारा पहिलाच भारतीय ठरला आहे.
हार्दिकने वर्ल्ड कप फायनलमध्ये निर्णायक कामगिरी केली. हार्दिकने बॉलिंगने धमाका केला. हार्दिकने हेन्रिक क्लासेन आण डेव्हिड मिलर या दोघांना निर्णायक क्षणी आऊट करत टीम इंडियाला कमबॅक करुन दिलं. हार्दिकने 2 विकेट्स घेत टीम इंडियाच्या 7 धावांनी मिळवलेल्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. हार्दिकने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर अप्रतिम कामगिरी केली. हार्दिकने खऱ्या अर्थाने अष्टपैलू या भूमिकेला न्याय दिला.
पंड्याचं ‘हार्दिक’ अभिनंदन
Hardik Pandya rises to No.1 in the latest ICC Men’s T20I All-rounder Rankings 🔝
How the Rankings look after #T20WorldCup 2024 ⬇️https://t.co/vbOk3XT7C3
— ICC (@ICC) July 3, 2024
हार्दिकची टी 20 वर्ल्ड कपमधील कामगिरी
हार्दिक या टी 20 वर्ल्ड कपमध्ये साखळी ते अंतिम असे एकूण 8 सामने खेळला. हार्दिकने या 8 सामन्यात 48 च्या सरासरीने 144 धावा केल्या. तर 7.64 च्या इकॉनॉमीने 11 विकेट्सही घेतल्या.