Hardik Pandya : हार्दिक पांड्याकडून सर्वांसमोर टीम इंडियाच्या खेळाडूला शिवीगाळ? व्हीडिओ व्हायरल
हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) लाईव्ह सामन्यादरम्यान शिवी दिल्याचं म्हटलं जात आहे.
Hardik Pandya Abused To Washington Sundar : टीम इंडियात (Indian Cricket Team) सध्या काय चाललंय, असा सवाल आता क्रिकेट चाहत्यांकडून विचारला जात आहे. काही दिवसांपूर्वी दीपक हुड्डाने श्रीलंका विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात अंपायरसाठी अपशब्द वापरले होते. त्यानंतर उमरान मलिकने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या सामन्यात मोहम्मद सिराजने मिस फिल्ड केल्याने अपशब्द वापरले. तर आता हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) नंबर लावलाय. हार्दिकने शिवी दिल्याचा दावा करणारा व्हीडिओ व्हायरल होतोय. (team india vice captain hardik pandya abused to indian player for late for water ind vs sl 2nd odi eden garden kolkata)
नक्की काय झालं?
हार्दिकने वॉशिंग्टनला भर मैदानात लाईव्ह सामन्यादरम्यान शिवी दिल्याचं म्हटलं जात आहे. सुंदरला शिवी दिल्याचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. श्रीलंकेच्या बॅटिंगदरम्यान 11 व्या ओव्हरमध्ये हा सर्व प्रकार घडला. 11 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर हार्दिकचा या व्हायरल व्हीडिओत आवाज येतोय. “गेल्या ओव्हरमध्ये पाणी मागितलं होतं. तिथं काय @#…”, अशा शब्दात हार्दिकने वॉशिंग्टन सुंदरला शिवीगाळ केल्याचा दावा केला जात आहे.
” Pani maga tha last over, G@nd mara rahe ho udhar ” Hardik ?? @hardikpandya7 #INDvsSL #Cricket #viratkohli @imVkohli pic.twitter.com/JpMxAi8y69
— Rahul Yadav (@Rahul_Yadav00) January 12, 2023
दरम्यान याआधी श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या सामन्यात ‘जम्मू एक्सप्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमरान मलिक मोहम्मद सिराजला नको नको ते बोलला. हा सर्व प्रकार श्रीलंकेच्या बॅटिंगदरम्यान 33 व्या ओव्हरमध्ये घडला.
उमरान बॉलिंग टाकत होता. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर श्रीलंकेचा फलंदाज चमीका करुणारत्नेने लॉन्ग ऑफच्या दिशेने शॉट मारला. मोहम्मद सिराज त्या दिशेला होचा. मात्र सिराजला बॉल अडवता आला नाही. त्यामुळे श्रीलंकेला 4 धावा मिळाल्या. मग काय उमरानचा पारा चढला. उमरान सिराजला नको नको ते बोलून गेला.
टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात
दरम्यान दुसऱ्या सामन्यात 216 धावांचा पाठलाग करायला आलेल्या टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने 62 धावांवर 3 विकेट्स गमावल्या आहेत. रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहलीच्या रुपात टीम इंडियाने 3 विकेट्स फेकल्या. टीम इंडियाला ताज्या आकडेवारीनुसार, मालिका विजयासाठी आणखी 149 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे आता या सामन्याचा निकाल काय लागतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलंय.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : दसून शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस, अविष्का फर्नांडो, चारित असलांका, धनंजय डी सिल्वा, नुवानिदु फर्नांडो, वानिंदु हसरंगा, चामिका करुणारत्ने, दुनिथ वेलेज, लाहिरू कुमारा आणि कसुन रजिता.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि उमरान मलिक.