Video : विजयी मिरवणुकीत झाडावर चढलेल्या फॅन्सने काढलेला व्हिडीओ आला समोर, कोहलीची अशी होती रिॲक्शन
टी20 वर्ल्डकप विजेत्या संघाचं मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाचं कौतुक करण्यासाठी लाखोंचा जनसागर लोटला होता. यावेळी एक चाहता झाडाच्या शेंड्यावर चढून लाडक्या टीम इंडियाचं शूट करत होता. त्यावेळी त्या फॅन्सने नेमकं काय शूट केलं तो व्हिडीओ समोर आला आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील विजयाचा जल्लोष स्मरणात राहणारा आहे. प्रत्येक जण टीम इंडियाचं दर्शन घेण्यासाठी उत्सुक होता. मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियममधील गर्दीवर हेच दिसत होतं. ही गर्दी पाहून टीम इंडियाच्या खेळाडूंचा ऊर भरून आला. गर्दीतून वाट काढत टीम इंडियाची बस पुढे जात होती. यावेळी चाहते टीम इंडियाच्या खेळाडूंची झलक पाहून स्वत:ला धन्य मानत होते. हा सोहळा डोळ्यात साठवून अनेकांनी आपल्या आयुष्याचं एक पान लिहिलं आहे. या सर्व चाहत्यांमध्ये झाडावर चढून टीम इंडियाला पाहणाऱ्या खेळाडूची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली. जीवाची बाजी लावून हा चाहता झाडाच्या फांदीवर अक्षरश: झोपला होता. टीम इंडियाच्या खेळाडूंची त्याने किती तास वाट पाहिली असावी याबाबत आता सांगणं कठीण आहे. या चाहत्याचा वेडेपणा कॅमेऱ्यात कैद झाला आणि बघता बघता वाऱ्यासारखा पसरला. अनेकांनी त्याचा हा वेडेपणा पाहून आनंद लुटला. व्हिडीओखाली मजेशीर प्रतिक्रिया देऊन मजा घेत आहे. पण अनेकांना त्याने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यातून काय चित्रित केलं असा प्रश्न पडला होता. आता हा प्रश्नही सुटला आहे. कारण त्याने शूट केलेला व्हिडीओ आता समोर आला आहे.
टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत हा एकमेव फॅन संघाच्या जवळ होता. या चाहत्याला सर्वात आधी रनमशिन्स विराट कोहलीने पाहिलं. त्यानंतर विराट कोहलीने रवींद्र जडेजाला त्या चाहत्याकडे पाहण्यासाठी हात लावला. तेव्हा त्याला पाहून रवींद्र जडेजाही आश्चर्यचकीत झाला. त्यानंतर त्याने चाहत्याच्या कॅमेऱ्याकडे पाहून हात हलवला. या दरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूंचे हावभाव पाहण्यासारखे होते. कारण झाडावर चढलेल्या फॅन्सला पाहून क्रिकेट क्रेझ किती आहे ते दिसत होतं.
Lmao 😭😭😭😭 pic.twitter.com/BFaxtwDoz6
— Dhobi ki mkc (@Flick_of_wrists) July 5, 2024
कर्णधार रोहित शर्माने त्या चाहत्याला पाहताच त्याला खाली उतरण्याची सूचना दिली. चाहत्यांच्या गरड्यात खरी बाजी मारून नेली ती झाडावरच्या फॅन्सने..कारण इतक्या जवळून संघ पाहता आला. तसेच कर्णधार रोहित शर्माला दखल घ्यावी लागली. तसेच विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनीही त्याला दाद दिली. त्यामुळेच या चाहत्याची चर्चा रंगली आहे.
Kohli asking rohit to see the fan who climbed up the tree😭❤️ pic.twitter.com/TjZ0r2mpuN
— Haritha⋆.ೃ (@Kohli_thetic_X) July 4, 2024
भारताने 11 वर्षानंतर आयसीसी चषक जिंकल्यानंतर चाहत्यांना किती आनंद झाला ते यावरून अधोरेखित झालं. इतकंच काय तर चाहत्यांची माणुसकी दिसून आली. इतक्या गर्दीतही चाहत्यांनी रुग्णवाहिकेला जागा करून दिली. यावरून मुंबईकर चाहत्यांचा संवेदना दिसून येतात.