Cricket : महत्त्वाच्या स्पर्धेसाठी संघ जाहीर;विराट-पंतचा समावेश
Virat Kohli-Rishabh Pant : विराट कोहली आणि ऋषभ पंत या टीम इंडियाच्या 2 स्टार खेळाडूंची महत्त्वाच्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच हर्षित राणा याचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मालिका गमवावी लागली. ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांची मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर आता टीम इंडिया मायदेशात इंग्लंडविरुद्ध टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. त्याआधी टीम इंडियाचे फलंदाज विराट कोहली आणि ऋषभ पंत नव्या आव्हानासाठी तयार झाले आहेत. टीम इंडियाचे हे स्टार खेळाडू आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी एका मोठ्या स्पर्धेत खेळताना दिसू शकतात.
विराट-पंतची रणजी टीममध्ये निवड
विजय हजारे ट्रॉफी फायनलनंतर रणजी ट्रॉफी 2024-2025 या स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना सुरुवात होणार आहे. दिल्लीचे हे 2 स्टार खेळाडू रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसू शकतात. डीडीसीएने दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांसाठी दिल्ली संघाची घोषणा केली आहे. दिल्ली टीममध्ये या दोघांव्यतिरिक्त हर्षित राणा याचाही समावेश करण्यात आलेला आहे.
डीडीसीएने दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांसाठी तब्बल 38 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या 38 खेळाडूंमध्ये 3 कॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे. मात्र हे तिघेही खेळणार की नाहीत? याबाबत डीडीसीएने मोठी अपडेट दिली आहे. हे तिघेही खेळाडू खेळणार की नाहीत? हे त्यांच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल, असं डीडीसीएने स्पष्ट केलं. मात्र दुसऱ्या बाजूला क्रिकेट चाहते या तिन्ही खेळाडूंना पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला उत्सूक आहेत.
विराट पंत आणि हर्षितची दिल्लीत निवड
🚨 DELHI SQUAD FOR 2ND ROUND IN THIS RANJI TROPHY 2025 🚨
– Virat Kohli & Rishabh Pant in the Squad..!!!! pic.twitter.com/gMcWAUEWj5
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 14, 2025
रोहितचा मुंबईसह सराव
दरम्यान दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने मुंबई टीमसह सराव केला. मुंबई टीम रणजी ट्रॉफीत 23 जानेवारीला बीकेसीत जम्मू-काश्मीरविरुद्ध भिडणार आहे. त्यामुळे या सामन्यात रोहित शर्मासह यशस्वी जयस्वाल ही टीम इंडियाची सलामी जोडी मुंबईकडून पुन्हा एकदा खेळताना दिसू शकते.