Virat Kohli इतिहास रचणार, रनमशीनचं पुढील मिशन काय?
India vs Bangladesh Test Series: विराटने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असंख्य विक्रम केले आहेत. आता विराटचा एका खास कीर्तीमान करण्याकडे लक्ष आहे.
टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध मायदेशात 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही मालिका असणार आहे. सलामीच्या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला या मालिकेत खास कामगिरी करण्याची संधी आहे. टीम इंडियाकडून आतापर्यंत अशी कामगिरी करण्यात फक्त तिघांनाच यश आलं आहे. विराटला त्यासाठी बांगलादेश विरुद्ध 152 धावांची गरज आहे. विराटने 152 धावा केल्यास, तो कसोटी क्रिकेटमध्ये 9 हजार धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरेल. सध्या कसोटी क्रिकेटमध्ये 9 हजार धावा करणाऱ्या सक्रीय फलंदाजांमध्ये इंग्लंडचा जो रुट आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथ याचा समावेश आहे. जो रुट याने कसोटीत आतापर्यंत 12 हजार 377 धावा केल्या आहेत. तर स्टीव्हन स्मिथच्या नावावर 9 हजार 685 धावांची नोंद आहे.
टीम इंडियासाठी आतापर्यंत कसोटी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर या तिघांनी 9 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. तसेच विराट 9 हजार धावा करणारा तिसरा फलंदाज ठरेल. विराटच्या नावावर सध्या कसोटीत 8 हजार 848 धावा आहेत. तर कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा टीम इंडियाच्या सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे, जो 12 वर्षांपासून अबाधित आहे. सचिनने त्याच्या 200 सामन्यांच्या कारकीर्दीत 15 हजार 921 धावा केल्या आहेत.
भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा
- सचिन तेंडुलकर – 15 हजार 921 धावा
- राहुल द्रविड – 13 हजार 288 धावा
- सुनील गावस्कर – 10 हजार 122 धावा
- विराट कोहली – 8 हजार 848 धावा
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 19 ते 23 सप्टेंबर, चेन्नई
दुसरा सामना, 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर, कानपूर
विराट कोहलीला या 9 हजार धावांचा टप्पा याआधीच पूर्ण करण्याची संधी होती. मात्र विराट गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने टेस्ट क्रिकेट खेळला नाहीय. त्यामुळे विराटची ही प्रतिक्षा आता सप्टेंबर महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. विराट 2024 वर्षात आतापर्यंत फक्त 1 सामनाच खेळलाय. विराटने हा एकमेव सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.
विराट 152 धावा दूर
Virat Kohli needs 152 runs to complete 9000 runs in Test cricket.
– The GOAT. 🐐 pic.twitter.com/tz95vkd1WT
— Johns. (@CricCrazyJohns) January 20, 2024
बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संभावित संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.