IND vs AFG 1st T20 | अफगाणिस्तानविरूद्ध पहिल्या टी-20 सामन्यात लावा ही Dream 11, होताल मालामाल
IND vs AFG 1st T20 - टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमध्ये पहिला टी-20 सामना होणार आहे. या सामन्यासाठी ड्रीम 11 लावत असाल तर खाली दिलेल्या संघाची तुम्हाला मदत होऊ शकते.
मुंबई : टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील पहिला टी-20 सामना आज होणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली खेळणार नाही. टीम इंडियाची वर्ल्ड कप आधी एकमेव टी-20 मालिका होणार आहे. अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेमध्ये रोहित शर्माकडेच कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. आजच्या सामन्यासाठी ड्रीम 11 लावणार असाल तर खाली दिलेल्या संघाची तुम्हाला नक्की मदत होणार आहे.
आजचा सामना मोहालीमधील IS बिंद्रा स्टेडियममध्ये पार पडणार आहे. ड्रीम 11 मध्ये विकेटकीपर म्हणून अफगाणिस्तानचा खेळाडू रहमानउल्ला गुरबाज याला संघात स्थान दिलं आहे. तर बॅट्समन रोहित शर्मा, रिंकू सिंग, हजरतुल्ला झाझई आणि यशस्वी जयस्वाल यांची निवड करा. ऑल राऊंडर्समध्ये मोहम्मद नबी, अक्षर पटेल, अजमतुल्ला उमरझाई यांना संघात स्थान द्या.
अशी लावा ड्रीम 11
विकेट-कीपर: रहमानउल्ला गुरबाज, बॅट्समन : रोहित शर्मा (कॅप्टन), रिंकू सिंग, हजरतुल्ला झाझई, यशस्वी जयस्वाल, ऑल राऊंडर्स : मोहम्मद नबी, अक्षर पटेल, अजमतुल्ला उमरझाई, बॉलर : कुलदीप यादव, अर्शदीप सिंग (उपकप्तान), मुजीब-उर-रहमान
दरम्यान, तीन सामन्यांची मालिका असून टीम इंडियाचा पहिला सामना मोहालीमध्ये होणार आहे. तर दुसरा सामना, 14 जानेवारीला इंदूर आणि तिसरा आण अंतिम सामना 17 जानेवारीला बंगळुरुमध्ये पार पडणार आहे.
अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.
अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान..