IND vs NZ Head to Head : भारतीय संघ न्यूझीलंडविरूद्धचा 20 वर्षांचा दुष्काळ संपवणार? धक्कादायक आकडेवारी समोर!

IND vs NZ Head to Head : भारत आणि न्यूझीूलंडमध्ये होणाऱ्या सामन्यामध्ये हेड टू हेड दोन्ही संघांची कामगिरी पाहिलीत तर आकडेवारी पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. रोहितसेनेसाठी किंवींचं मोठं आव्हान असणार आहे.

IND vs NZ Head to Head : भारतीय संघ न्यूझीलंडविरूद्धचा 20 वर्षांचा दुष्काळ संपवणार? धक्कादायक आकडेवारी समोर!
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 3:17 PM

मुंबई : भारताचा वर्ल्ड कप 2023 मधील भारतीय संघाचा पाचवा सामना न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना हिमाचलमधील धर्मशाला हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनवर पार पडणार आहे. भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत अजिंक्य राहिला आहे. सलग चार विजयानंतर पाचव्या विजयासाठी भारतीय संघ सज्ज असणार आहे. मात्र दुसरीकडे न्यूझीलंड संघाचंही तगडं आव्हान भारतासमोर असणार आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाने विजय मिळवला तर 20 वर्षांचा पडलेला दुष्काळ संपवणार आहे.

20 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी रोहितसेना सज्ज

वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्युझीलंड संघ आतापर्यंत 9 वेळा आमने सामने आले आहेत. यामधील पाच सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाने तर भारताने 3 सामने जिंकले आहेत तर यामधील एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारताने न्यूझीलंडविरूद्ध 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये शेवटचा सामना जिंकला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत भारताने एकदाही किवींना पराभूत केलं नाही. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभूत वर्ल्ड कपबाहेर केलं होतं.

भारत आणि न्यूझीलंडमध्ये सात वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 ला धर्मशाळामध्ये शेवटचा सामना झाला होता. भारताने हा सामना जिंकला होता, न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 190 धावा केल्या होत्या, अवघ्या 40 ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाजांनी किंवींना गुंडाळलं होतं. भारताने या लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या 34 ओव्हरमध्ये चार विकेट गमावत हा सामना खिशात घातला होता.

दोन्ही संघांमधील हेड टू हेड आकडेवारी पाहिली तर दोन्ही संघांमध्ये 116 वन डे सामने झाले आहेत. यामधील 58 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंड संघाने 50 सामने जिंकले असून सात सामने अनिर्णित राहिले आहेत तर एक सामना बरोबरीत सुटला होता. मात्र वर्ल्ड कपमधील दुष्काळ भारतीय संघाला संपवावा लागणार आहे.

भारतीय संघ: रोहित शर्मा (C, हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशान किशन, सूर्य कुमार यादव.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.