IND vs SA | पहिल्या कसोटीमधील पराभवानंतर टीम इंडियामध्ये स्टार खेळाडूची एन्ट्री, ताकद दुपटीने वाढणार
Mohammed Shami Replace Player : पहिल्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियाचा झालेल्या पराभवाने क्रिकेट चाहत्यांनाही धक्का बसला आहे. वर्ल्ड कपमधील पराभवानंतर हा दुसरा मोठा पराभव आहे. टीम इंडियामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम मॅनेजमेंटने स्टार खेळाडूची निवड केली आहे.
मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला मानहानिकारक पराभवाचा सामना करावा लागला. एक डाव आणि 32 धावांनी साऊथ आफ्रिका संघाने विजय मिळवत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाची गोलंदाजी आणि फलंदाजी सपशेल अपयशी ठरलेली दिसली. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे नाहीतर टीम इंडियावर 2-0 ने मालिका गमावण्याची नामुष्की येऊ शकते. अशातच टीम इंडियामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी एका स्टार खेळाडूचा स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात आला आहे.
कोण आहे तो मॅचविनर खेळाडू
या मॅचविनर खेळाडूच्या येण्याची संघाची ताकद वाढली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून आवेश खान आहे. आताच पार पडलेल्या वन डे मालिकेमध्येही तो खेळला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमी याच्या जागी बदला खेळाडू म्हणून त्याची संघात निवड केली आहे. याबाबत बीसीसीआयने एक्स (ट्विट) करत माहिती दिली आहे.
🚨 NEWS 🚨
Avesh Khan added to India’s squad for 2nd Test.
Details 🔽 #TeamIndia | #SAvINDhttps://t.co/EsNGJAo8Vl
— BCCI (@BCCI) December 29, 2023
वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात आवेश खानने मॅच विनरची भूमिका बजावली होती. त्याने 27 धावांत चार विकेट घेतल्यामुळे यजमान संघ 27.3 षटकांत 116 धावांवर ऑल आऊट झाला होता.
कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध्द कृष्णा, केएस भरत (WK), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान.