IND vs SA | आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या टेस्टआधी वाईट बातमी, टीम इंडियाच्या मागे मोठी साडेसाती
SA vs IND 1st Test | टीम इंडिया आफ्रिकेमध्ये इतिहास रचण्याच्या उद्देशानेच परवा म्हणजेच 26 डिसेंबरला मैदानात उतणार आहे. आफ्रिकेमध्ये टीम इंडियाने कसोटी मालिका जिंकलेली नाही. मात्र या मिशनआधीच मोठं विघ्न उभं राहिलं आहे.
मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. यामधील पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरला म्हणजेच दोन दिवसांनी मंगळवारी पार पडणार आहे. याआधी झालेली टी-20 मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली, वन डे मालिका टीम इंडियाने 2-1 ने जिंकली. आता कसोटी मालिका जिंकण्याच्या इराद्याने रोहित अँड कंपनी मैदानात उतरतील. टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेमध्ये आतापर्यंत मालिका जिंकलेली नाही. अशातच आफ्रिकेविरूद्धच्या टेस्ट आधी वाईट बातमी समोर आली आहे.
नेमकं काय झालं?
टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यााआधी मोठं विघ्न आलं आहे. पहिला कसोटी सामना हा सेंच्युरियन येथे होणार असून तेथे पाऊस पडण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवसाचा खेळ होईल की नाही याबाबत काहीच नक्की नाही. सेंच्युरियनचे पिच क्युरेटर ब्रायन ब्लॉय यांनीच पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होईल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह असल्याचं सांगितलं आहे.
टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांंच्यात झालेल्या पहिल्या टी-2o सामन्यातही पावसाने हजेरी लावली होती. दौऱ्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला होता. अशातच आता कसोटी सामन्यावरही पावसाचं संकट असल्याने क्रिकेट प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
मला आशा आहे की तिसर्या दिवशी काही खेळ होईल आणि ते ठीक होईल पण मला माहित नाही की पिच कसं असेल. पिचवर कवर्स असतील तर पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या संघासाठी अडचणीचं ठरेल. कारण कव्हर्समुळे पिच झाकलं गेलेलं असेल. पावसानंतर स्पिनर्सला पिचवरून कमी मदत मिळेल, असं पिच क्युरेटर ब्रायन ब्लॉय यांनी सांगितलं आहे.
टीम इंडिया : रोहित शर्मा (C), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अभिमन्यू ईश्वरन, केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (VC) प्रसिध कृष्णा आणि केएस भरत (WK).