IND vs SA | आफ्रिकेविरूद्धच्या टेस्टसाठी गावसकरांनी निवडली टीम इंडियाची प्लेइंग 11, या खेळाडूला बाहेरचा रस्ता

SA vs IND 1st Test : वन डे मालिका जिंकल्यावर आता कसोटी मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गावसकर यांनी प्लेइंग 11 निवडली आहे पाहा कोणाला संधी दिली आहे.

IND vs SA | आफ्रिकेविरूद्धच्या टेस्टसाठी गावसकरांनी निवडली टीम इंडियाची प्लेइंग 11, या खेळाडूला बाहेरचा रस्ता
Follow us
| Updated on: Dec 24, 2023 | 5:35 PM

मुंबई : टीम इंडिय आणि साऊथ आफ्रिकेमधील पहिल्या टेस्टला अवघे दोन दिवस बाकी आहेत. सेंच्युरियनमध्ये हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. वर्ल्ड कपनंतर टीम इंडियामधील वरिष्ठ खेळाडू पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहेत. यामध्ये विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा हा पहिलाच सामना असणार आहे. या कसोटी सामन्यासाठी माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी टीम इंडियाची प्लेइंग 11 निवडली आहे.

सेंच्युरियनमधील टेस्टमध्ये सर्वांचं लक्ष टीम इंडिया प्लेइंग 11 कडे  लागलेलं असणार आहे . दोन स्पिनर्सला खेळवणार की कोणा एकाला खाली बसवणार? प्लेइंंग 11 मध्ये आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा या दोघांपैकी कोणाला जागा द्यायची?  टीम मॅनेजमेंटसमोर मोठं आव्हान असणार आहे. खेळपट्टी पाहायला गेली तर वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरेल असं मानलं जात आहे. गावसकर यांनी या टेस्टसाठी जो संघ निवडला आहे त्यामध्ये पाहा कोणाला संधी दिली आहे जाणून घ्या.

सुनील गावसकर यांनी निवडलेल्या संघात के एल राहुल याला विकेट कीपर म्हणून घेतलं आहे. तर गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार आणि मोहम्मद सिराज यांना स्थान दिलं आहे. तर दोन्ही स्पिनर्सला खेळवण्यात यावं असं त्यांना वाटत आहे. मात्र प्लेइंग  11 मध्ये गावसकर यांनी शार्दूल ठाकूर याला वगळलं आहे. मात्र तसं पाहायला गेलं तर पहिल्या कसोटी सामन्यात शार्दुलची निवड होण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी सुनील गावसकरांनी निवडलेला संघ:- रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. .

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.