IND vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीत साऊथ आफ्रिका 55 वर ऑल आऊट, सिराज जोमात आफ्रिका कोमात
Mohammed Siraj 6 Wicket : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने शानदार सुरूवात केली आहे. पहिल्या सेशनमध्ये टीम इंडियाने आफ्रिकेला गुंडाळत इतिहास रचला आहे.
मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये यजमान आफ्रिकेचा संघ 55 धावांवर ऑल आऊट झाला आहे. टीम इंडियाचे गोलंदाज जखमी वाघासारखे आफ्रिकेच्या फलंदाजांवावर तुटून पडले होते. मोहम्मद सिराज याने सर्वाधिक सहा विकेट घेत अर्ध्यापेक्षा जास्त खेळाडूंना आऊट केलं. तर जसप्रीत बुमराहने दोन आणि मुकेश कुमारने दोन विकेट घेतल्या. पहिलं सेशन संपण्याच्या आत टीम इंडियाने आफ्रिका संघाला ऑल आऊट केलं.
साऊथ आफ्रिका संघाचा कर्णधार डीन एल्गर याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला, मोहम्मद सिराज याने सुरूवातीपासूनच आक्रमक मारा करत आफ्रिकेच्या बॅटींगला सुरूंग लावलं. साऊथ आफ्रिका संघाचा टीम इंडियाविरूद्धचा इतिहासातील सर्वात कमी स्कोर ठरलाय.
एडन मार्करम आणि डीन एल्गर ओपनिंगला आले होते, चौथ्याच ओव्हरमध्ये सिराजने मार्करमला दोन धावांवर आऊट केलं. पहिली विकेटनंतर सहाव्या ओव्हरमध्येच सिराजने कॅप्टन डीन एल्गर यालाही चार धावांवर बोल्ड केलं. दोन विकेटनंतर आफ्रिकेचा पदार्पणवीर ट्रिस्टन स्टब्स याला दोन धांवावर बुमराहने बोल्ड केलं.
पुढच्याच ओव्हरमध्ये सिराजने टोनी डी झोर्झी याला माघारी पाठवलं. डेव्हिड बेडिंगहॅम 12 धावा, काइल वेरेन (15 धावा), मार्को जॅनसेन (o धावा) यांना सिराजने पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर मुकेश कुमार यानेही आपलं विकेटचं खातं उघडलं. मुकेशने केशव महाराज 3 धावा आणि कगिसो रबाडाला आऊट करत आफ्रिकेला ऑल आऊट केलं.
Innings Break!
A stupendous outing for our bowlers in the first innings as South Africa are all out for 55 runs in the first session of the 2nd Test.
This is the lowest Test score by an opposition against India.
Scorecard – https://t.co/j9tTnGLuBP #SAvIND pic.twitter.com/86iHajl5Yu
— BCCI (@BCCI) January 3, 2024
दरम्यान, पहिल्या सेशनमध्ये सहा विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. टीम इंडियासाठी आफ्रिकेमध्ये एका डावात सर्वात कमी धावा देत सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
डीन एल्गर (कॅप्टन), एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी
रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, मुकेश कुमार