IND vs SA 2nd Test | ‘2024 मधील क्रिकेटची सुरूवात…’; कसोटीतील पहिल्या दिवसानंतर सचिन तेंडुलकरचं ट्विट व्हायरल

Sachin Tendulkar Twit on IND vs SA second test : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी तब्बल तेवीस विकेट पडल्या. जगभरात या कसोटी सामन्याची चर्चा होत असताना यावर सचिन तेंडुलकर याने ट्विट केलं आहे.

IND vs SA 2nd Test | '2024 मधील क्रिकेटची सुरूवात...'; कसोटीतील पहिल्या दिवसानंतर सचिन तेंडुलकरचं ट्विट व्हायरल
Sachin Tendulkar twit on ind vs sa first test
Follow us
| Updated on: Jan 03, 2024 | 10:31 PM

मुंबई : साऊथ आफ्रिका आणि टीम इंडियामध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये पहिल्याच दिवशी खूप काही घडलं, दोन्ही संघ एकदा ऑल आऊट झाले. त्यानंतर दुसऱ्या डावातही आफ्रिकेच्या तीन विकेट गेल्या आहेत. पिचवरून असं वाटतं की दुसरी कसोटी दुसऱ्याच दिवशी संपेल. कारण वेगवान गोलंदाजांना पिचवर मदत मिळत आहे. टीम इंडियाकडे आणखीन 36 धावांची आवश्यकता आहे. आजचा सामना एखाद्या सिनेमाच्या स्क्रिप्टपेक्षा काही कमी नव्हता. आफ्रिका 55  तर एकवेळ टीम इंडिया 153 वर चार विकेटवर होती. त्यानंतर 13 बॉलमध्ये सगळं काही बदललं आणि टीम इंडिया ऑल आऊट झाली. यावर माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला सचिन तेंडुलकर?

2024 मधील क्रिकेटची सुरूवात एका दिवसात 23 विकेट पडून होते. अविश्वसनीय साऊथ आफ्रिका ऑल आऊट झाल्यावर मी फ्लाईटमध्ये चढलो होतो. घरी आलो आणि टीव्ही पाहतो तर काय आफ्रिकेने 3 विकेट गमावल्या होत्या. मी नेमकं काय मिस केलं, असं सचिन तेंडुलकर याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सचिनचं ट्विट-:

पहिल्या सेशनमध्येच आफ्रिकेचा संघ 55 धावांवर ऑल आऊट झाला होता. मोहम्मद सिराज याने सर्वाधिक सहा तर जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. त्यानंतर टीम इंडियाने चांगली सुरूवात केली होती. टी-ब्रेकपर्यंत चार विकेट पडल्या होत्या, त्यानंतर टीम इंडियाचा के.एल. राहुल आऊट झाल्यावर पत्त्यांच्या बंगल्यासारख्या विकेट पडल्या. आफ्रिका संघ परत फलंदाजी करायला उतरल्यावरही त्यांच्या तीन विकेट गेल्या. मुकेश कुमार याने दोन तर बुमराहने एक विकेट घेतली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

डीन एल्गर (कॅप्टन), एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी

रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.