Indian Cricket Team | टीम इंडिया मंगळवारी खेळणार 2 सामने, जाणून घ्या
Indian Cricket Team 2 Match On 3 October 2023 | टीम इंडियाला 3 ऑक्टोबर रोजी 24 तासांमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी 2 सामने खेळायचे आहेत. हे सामने केव्हा सुरु होणार? एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही.
मुंबई | टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड कप 2023 साठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना हा 8 ऑक्टोबरला चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळणार आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया 12 वर्षानंतर पुन्हा एकदा भारतात वर्ल्ड कप जिंकण्याच्या प्रयत्न करणार आहे. वर्ल्ड कपमधील मुख्य सामन्यांआधी टीम इंडियाची मंगळवारी 3 ऑक्टोबर रोजी अग्निपरीक्षा असणार आहे. कारण टीम इंडियाला एकाच दिवशी 2 सामने खेळायचे आहेत.
टीम इंडिया मंगळवारी आयसीसी वनडे वर्ल्ड कपआधी सराव सामना खेळणार आहे. टीम इंडिया मंगळवारी पहिला सामना हा नेपाळ विरुद्ध खेळणार आहे. एशियन गेम्स 2023 मधील हा क्वार्टर फायनल सामना असणार आहे. हा सामना होंगझोऊ येथे होणार आहे. या सामन्याला सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. ऋतुराज गायकवाड या टीमचं कर्णधारपद सांभाळणार आहे. टीम इंडियाने आयसीसी रँकिंगच्या आधारावर थेट क्वार्टर फायनलमध्ये जागा मिळवली आहे.
तर टीम इंडियाचा इंग्लंड विरुद्धचा पहिला सराव सामना हा पावसामुळे रद्द झाला. तर आता दुसरा आणि अखेरचा सामना हा नेदरलँड विरुद्ध होणार आहे. हा सामना तिरुवनंतपुरम इथे पार पडणार आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरु होणार आहे. टीम इंडिया हा सामना रोहित शर्मा याच्या नेतृत्वात खेळणार आहे. थोडक्यात काय तर या दोन्ही सामन्यांसाठी टीम इंडियाचे 2 वेगवेगळे संघ आहेत.
आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
एशियन गेम्स 2023 साठी टीम इंडिया | ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आकाश दीप, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)
राखीव खेळाडू | यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन.