टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया दोन गटात जाणार अमेरिकेत, कारण की…

टी20 वर्ल्डकप स्पर्धा 1 जूनपासून सुरु होमार आहे. तर टीम इंडियाचा वर्ल्डकपमधील प्रवास हा 5 जूनपासून सुरु होणार आहे. आयर्लंडसोबत भारत पहिला सामना खेळणार आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी टीम इंडिया दोन गटात अमेरिकेत जाणार आहे. पण असं का ते समजून घेऊयात

टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया दोन गटात जाणार अमेरिकेत, कारण की...
Follow us
| Updated on: May 13, 2024 | 5:24 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला आता अवघ्या दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 1 जूनपासून टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजणार आहे. भारतीय वेळेनुसार पहिला सामना हा 2 जून रोजी असणार आहे. भारताचा पहिला सामना आयर्लंडसोबत 5 जूनला असणार आहे. बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्वात टी20 वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा केली आहे. तर उपकर्णधारपदाची माळ हार्दिक पांड्याच्या गळ्यात घातली आहे. तर चार खेळाडूंची राखीव म्हणून घोषणा करण्यात आली आहे. अशी सर्व वर्ल्डकपची तयारी सुरु असताना आयपीएल स्पर्धेचा शेवटचा टप्पा सुरु आहे. निवडलेले खेळाडू आता आयपीएल स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ दोन गटात अमेरिकेला रवाना होईल. कारण भारतीय संघ साखळी फेरीतील सामने तिथेच खेळणार आहे.

आयपीएल स्पर्धेत प्लेऑफसाठी चुरस आता अंतिम टप्प्यात आहे. यापैकी फक्त चार संघ आता प्लेऑफसाठी पात्र ठरतील. त्यामुळे उर्वरित सहा संघातील खेळाडूंसाठी आयपीएल स्पर्धा संपलेली असेल. त्यामुळे या सहा संघातील खेळाडू पहिल्या टप्प्यात अमेरिकेत जातील. आयपीएल साखळी फेरीतील शेवटचा सामना 19 मे रोजी आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाईल. या दिवशी प्लेऑफचं सर्व चित्र स्पष्ट असेल.

टीम इंडियातील टी20 वर्ल्डकप स्पर्धेत प्लेइंग इलेव्हनचा भाग असतील असे खेळाडू मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स या संघात आहेत. त्यात कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, अर्शदीप सिंग यासह प्लेऑफमध्ये स्थान न मिळवणाऱ्या संघातील खेळाडू पहिल्या टप्प्यात अमेरिकेत रवाना होतील. तर उर्वरित खेळाडू आयपीएल अंतिम सामना पार पडला की अमेरिकेला येतील.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा पहिला सामना आयर्लंडशी 5 जूनला आहे. त्यानंतर 9 जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी लढत होणार आहे. तर 12 जूनला अमेरिका आणि 15 जूनला कॅनडाशी लढत होईल. या गटात टॉप 2 ला असलेले संघ सुपर 8 फेरीत खेळतील. भारतीय संघ सुपर 8 फेरीत पोहोचला की हे सामने वेस्ट इंडिजमध्ये होतील.

टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज. राखीव खेळाडू: शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.